

Pimpri Chinchwad Municipal Corporation
sakal
पिंपरी - पिंपरी चिंचवड महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या निविदा प्रकरणात १९ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी (ता. २९) अटक केली. प्रमोद सुधाकर ओंभासे (वय ५७, रा. प्राधिकरण, निगडी) असे त्यांचे नाव आहे. ५७ वर्षीय ठेकेदाराने ‘एसीबी’ कडे तक्रार दिली होती.