Pimpri Chinchwad fire brigade : गेल्या वर्षी दिवाळीत आगीच्या ७० घटना; यंदा पिंपरी-चिंचवडमध्ये २० अग्निशमन वाहने सज्ज, २२ संवेदनशील ठिकाणांवर २४ तास लक्ष

Diwali Fire Safety : दिवाळीत आगीच्या घटना टाळण्यासाठी महापालिकेने २० अग्निशमन वाहने सज्ज ठेवली आहेत. आठ वाहनांद्वारे गस्त सुरू असून, शहरातील २२ संवेदनशील ठिकाणांवर विशेष लक्ष दिले जात आहे.
Fire brigade teams on alert across Pimpri Chinchwad during Diwali.

Fire brigade teams on alert across Pimpri Chinchwad during Diwali.

esakal

Updated on: 

पिंपरी : दिवाळीच्या कालावधीत आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी महापालिका अग्निशमन दल सज्ज झाले आहे. त्यांनी विशेष पथकांमार्फत गस्त वाढवली असून २५० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षातील घटनांचा अभ्यास करून शहरातील २२ संवेदनशील ठिकाणे निश्चित केली आहेत. २५० कर्मचारी, २० मोठी अग्निशमन वाहने आणि गस्ती वाहनांद्वारे २४ तास गस्त घालण्यात येणार आहे. नागरिकांनीही फटाके फोडताना आवश्यक खबरदारी घ्यावी. दुर्घटना घडल्यास तातडीने अग्निशमन विभागाशी संपर्क साधावा.

Loading content, please wait...