

Pimpri Chinchwad Municipal Corporation
esakal
पिंपरी, ता. ३०: पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी 'ए-वी' फॉर्मसाठी इच्छुकांना झुलवत ठेवले. 'महायुती' व 'महाविकास आघाडी' होईल, या शक्यतेवर अनेक जण थांबून होते. मात्र, शेवटच्या काही मिनिटांत भाजप-शिवसेनेवी युती फुटली, तर योन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने महाविकास आघाडीही तुटली. त्यातील दोन पक्षांनी एकत्र येत दोन नवीन सहकाऱ्यांसमवेत स्वतंत्र आघाडी केली आहे. त्यामुळे शहरात चौरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले असून, खन्या लढती अर्ज माघारीनंतरच स्पष्ट होतील.