

Ajit Pawar Faces Major Setback in Pimpri-Chinchwad Civic Polls
esakal
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना अनेक धक्के बसले. यातील सर्वात मोठा झटका म्हणजे महापालिकेवरचा ताबा गमावणे. एकूण ३२ प्रभागांतील १२८ जागांसाठी ६९१ उमेदवार रिंगणात उतरले होते. निकालानुसार, भाजपने ८४ जागा पटकावल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसला ३७ जागा मिळाल्या. शिवसेनेने ६ जागा जिंकल्या, आणि एक अपक्ष उमेदवार विजयी ठरला.