

CMC Fodder Cultivation Project for Drought Affected Farmer
esakal
पिंपरी : राज्यावर ओढवलेल्या भीषण दुष्काळाच्या संकटावर मात करण्यासाठी आणि दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांना दिलासा देण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ‘दुष्काळ हिरवा करू’ या मोहिमेंतर्गत शहरातील संरक्षण विभागाच्या ताब्यातील सुमारे ४०० एकर मोकळ्या भूखंडावर जनावरांसाठी चारा उगवण्याचा निर्णय घेण्यात आला. जानेवारीत प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू होणार असून, मार्च महिन्यात दुष्काळग्रस्त भागात चारा पाठवला जाईल.