संकटाचा सामना करण्यासाठी पिंपरी महापालिकेने केलाय असा 'अॅक्शन प्लॅन'

संकटाचा सामना करण्यासाठी पिंपरी महापालिकेने केलाय असा 'अॅक्शन प्लॅन'
Updated on

पिंपरी : गतवर्षी पुराच्या पाण्याने हाहाकार माजविल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेने यंदाच्या वर्षी पूर व वादळी वाऱ्याच्या संकटाचा सामना करण्यासाठी 'पूर नियंत्रण कृती आराखडा 2020' तयार केलेला आहे. त्याकरिता पूर नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) 1 जूनपासून तयार करण्यात आले असून, आठ क्षेत्रीय कार्यालयनिहाय 24 X 7 स्वतंत्र नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. 

सर्वात प्रथम नाले स्वच्छतेचा अहवाल मागविला असून, पुराने बाधित होणाऱ्या क्षेत्रांच्या नोंदी घेतल्या जाणार आहेत. तसेच या भागात संक्रमण शिबिरे राबविले जाणार असून शाळानिहाय आरोग्य, पाणी, वीज यांची सुविधा तपासली जाणार आहे. एक अधिकारी रुजू झाल्याशिवाय दुसऱ्या अधिकाऱ्याला पूर नियंत्रण कक्षाची जबाबदारी सोडता येणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. शहरात पूर नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांकाचे फलक तातडीने प्रसिद्ध करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी दिलेल्या आहेत. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दापोडीतील 'ह' प्रभागाकडे पुराच्या सर्व माहितीची जबाबदारी देण्यात आलेली आहे. मुळा, मुठा व पवना नदीचे पाणी झोपडपट्ट्यांमध्ये शिरणार नाही, ही दक्षता घेण्यासाठी सर्व विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होण्यासाठी ओढे-नाले व नदीकाठावर बांधकामांचे सर्वेक्षण व अतिक्रमण हटविण्यास 30 मे पर्यंतची मुदत देण्यात आलेली होती. ते अहवाल तपासले जाणार आहेत. त्याचप्रमाणे शहरातील खड्ड्यांचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. यासर्व कामकाजासाठी मेगा यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

अशी असेल अग्निशमन विभागाची जबाबदारी :

  • नागरिकांना रिक्षाद्वारे पुराच्या सूचना 
  • बाधित नागरिकांसाठी इस्कॉन मंदिराकडून जेवण व बचतगटांची मदत 
  • नागरिकांना वाचविण्यासाठी स्टॅंडबाय वाहने व कर्मचाऱ्यांचे पथक 
  • विसर्ग वाढल्यास सखल भागात अधिक दक्षता 
  • अग्निशमन विभागाची जबाबदारी मुख्य 
  • होडी व तत्सम यंत्रणा तयार ठेवणे 
  • लाइफ रिंग्स, जॅकेट्‌स, दोर सुस्थितीत गरजेचे 
  • सुसज्ज फायर यंत्रणा 
  • पाण्यात अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढणे महत्त्वाचे 
  • नावाडी व पुरात बचाव करणाऱ्या व्यक्तींची यादी तयार ठेवणे 

इतर विभागांची जबाबदारी व नेमून दिलेली कामे :

  • वायरलेस यंत्रणेसह स्पीकर व सायरन व्यवस्था 
  • पाणी पातळी व विसर्गाची प्रत्येक तासाला नोंद 
  • अतिक्रमण विभागाची वाहने 24 X 7 सुसज्ज ठेवणे 
  • क्रेन, जेसीबी, व अवजड यंत्रे उपलब्ध ठेवणे 
  • पुराच्या वेळी नदीकाठावर विद्युत व्यवस्था 
  • दिवे, विजेचे खांब, पोल यातून शॉक बसणार नाही ही खबरदारी 
  • अत्यावश्‍यक संपर्क क्रमांक जवळ बाळगणे 
  • धोकादायक फांद्यांची छाटणी करणे 
  • हवामानविषयक माहितीसाठी शासकीय खात्यांच्या संपर्कात 
  • तत्काळ पर्यायी रस्ते उपलब्ध करणे 
  • पाणी स्वच्छ व निर्जंतुक करणे 
  • पिण्याच्या पाण्यात ड्रेनेजचे पाणी मिसळू नये ही काळजी 
  • कचऱ्याची विल्हेवाट वेळेत लावणे 
  • सर्पमित्रांची यादी सर्वांना देणे 
  • चिंचवड, थेरगाव, रावेत, काळेवाडी पूल कॉल्मसना मार्किंग 
  • रुग्णवाहिका व दवाखान्याना अलर्ट व औषधांची उपलब्धता 
  • रुग्णालयांमध्ये पुरेशा खाटा उपलब्ध करणे 

हे आहे आवाहानात्मक काम

बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम विभागाने धोकादायक इमारतींचा सर्व्हे करून नोटिसा बजावणे. आपत्ती व अग्निशमन विभागाकडे तातडीने माहिती कळविणे. त्याचप्रमाणे पूर क्षेत्रातील स्थापत्य विषयक कामे लवकरात पूर्ण करणे. नदीपात्रालगत असणारे व लगतच्या अनधिकृत झोपडपट्ट्यांची पाहणी करून त्वरित काढणे. 

ही असेल धोक्‍याची पाणीपातळी (क्‍युसेक्‍स)

पातळी........इतर नद्या..........पवना 
एल शून्य......4 हजार...........5 हजार (प्रशासकीय) 
एल वन........10 हजार.........10 हजार 900 (नॉर्मल) 
एल टू..........20 हजार...........16 हजार 200 (अलर्ट) 
एल थ्री.........40 हजार...........35 हजार (धोकादायक) 
एल फोर......60 हजार...........55 हजार 800 (पूर पातळी ) 

गतवर्षीच्या बाधित भागावर करडी नजर 

भाटनगर, बौद्ध नगर, आंबेडकर कॉलनी, रावेत एसटीपी, जाधववाडी, वाल्हेकरवाडी, लक्ष्मीनगर,किवळे, पिंपळे निलख, शिक्षक सोसायटी, वाकड गावठाण, िंपपळे गुरव, पिंपरी, बोपखेल रामनगर, थेरगाव, संजय गांधी नगर, झुलेलाल घाट, रहाटणी, पिंपरी, सांगवीतील मुळा नगर, गुलाब नगर, कासारवाडीतील वंजारी वस्ती, भारतनगर, फुगेवाडी. 
 

पूर आराखड्याची काटेकोर अंमलबजावणी करून संकट ओढावल्यास महापालिका तयार आहे.
- संतोष पाटील, अतिरिक्त आयुक्त  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com