नाशिक फाटा ते वाकड आता सुसाट; पिंपरी-चिंचवड महापालिकेचं बजेट सादर

Pimpri Chinchwad Municipal Corporation presented the budget balance of Two and half crore
Pimpri Chinchwad Municipal Corporation presented the budget balance of Two and half crore

पिंपरी : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर महापालिका अंदाजपत्रक कसे असेल, याची उत्सुकता वाढलेली होती. मिळकत कर वाढ होणार की नाही याचीही उत्सुकता होती. मात्र, प्रत्यक्ष करवाढ न करता दोन कोटी 43 लाख रुपये शिलकी रकमेचे प्रारूप अंदाजपत्रक आयुक्त राजेश पाटील यांनी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांच्याकडे बुधवारी सादर केले. 5588 कोटी 78 लाख जमा रक्कम अपेक्षीत धरली असून अपेक्षित खर्च 5586 कोटी 35 लाख रुपये अाहे. स्थायी सदस्यांच्या अभ्यासानंतर बुधवारी, 24 फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता अंदापत्रकावर चर्चा होणार आहे. 

महत्त्वाचे उपक्रम
- पिंपरी वाघेरे येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणे
- बोऱ्हाडे वाडी मोशी येथे छत्रपती संभाजी महाराज यांचा शंभर फूट उंचीचा पुतळा उभारणे
- चिखली जाधववाडी गट नंबर 606 आरक्षण 1/446 येथे माध्यमिक शाळा इमारत बांधणे
- बोऱ्हाडे वाडी येथील गायरान जागेतील आरक्षणावर शाळा इमारत बांधणे
- थेरगाव सर्व्हे क्रमांक नऊ येथे बहुउद्देशीय इमारत बांधणे
- थेरगाव बापुजीबुआ नगर येथील सर्व्हे क्रमांक नऊ मध्ये दवाखाना बांधणे
- महापालिका दिलीप वेंगसकर अकादमीच्या पॅव्हेलियनचे उर्वरित काम करणे
- थेरगाव येथे डीपी आरक्षण 628 येथील खेळाचे मैदान विकसित करणे
- लोहगाव विमानतळाला जोडणारा चऱ्होलीतील 30 मीटर रस्त्याचे भूसंपादन पूर्ण करणे
- पुणे - नाशिक महामार्गासाठी भूसंपादन करणे
- मोशी येथील सर्व्हे क्रमांक 144 आरक्षण 1/204 येथे बहुउद्देशीय स्टेडियम बांधणे
- चिखली येथील गट क्रमांक 1653 व 1654 मध्ये रुग्णालय बांधणे
- सांगवी - किवळे रस्त्यावरील पवना नदीवर बास्केट पुलाशेजारी समांतर पूल बांधणे
- सांगवी - बोपोडी जोडण्यासाठी मुळा नदीवर पूल बांधणे
- बोपखेल येथील मुळा नदीवरील पुलाचे काम पूर्ण करणे
- नाशिक फाटा ते वाकड फ्री- वे करणे
- नाशिक महामार्गावरील पांजरपोळ ते आळंदी रस्ता विकसित करणे
- नाशिक फाटा ते वाकड रस्त्यावर सुदर्शन येथे ग्रेड सेपरेटर बांधणे
- विशाल नगर पिंपळे निलख आणि आकुर्डी रेल्वस्थानक परिसरातील चार रस्ते 18 ते 24 मीटर रुंद अर्बन स्ट्रीट संकल्पनेनुसार विकसित करणे
- भोसरी पुलाखाली आणि एम्पायर इस्टेट पुलाखाली 
  अर्बन स्ट्रीटनुसार विकसित करणे
- तळवडे आणि हिंजवडी आयटी पार्क जाणाऱ्या वाल्हेकर वाडी ते ताथवडे पर्यंतचा स्पाईन रस्ता विकसित करणे व पवना नदीवर पूल बांधणे

कोणासाठी काय तरतूद (कोटी रुपयांत)
- विकास कामे : 1630.73
- आठ क्षेत्रिय कार्यालये :  331.53
- विशेष नाविन्यपूर्ण योजना : 1232.34 
- शहरी गरीब :  1214.29
- महिला योजनांसाठी : 53.37
- महापौर विकास निधी : 8.55
- दिव्यांग कल्याणकारी योजना : 38.56
- पाणीपुरवठा विशेष निधी : 250
- पीएमपीसाठी : 238.21
- नगररचना भूसंपादन : 150
- अतिक्रमण निर्मूलन : 4
- स्वच्छ भारत अभियान : 1
- स्मार्ट सिटी : 100
- पंतप्रधान आवास योजना : 49
- अमृत योजना : 63.83

दृष्टिक्षेपात अंदाजपत्रक

जमा बाजू (कोटी रुपयांत)
आरंभीची शिल्लक : 625.11
स्थानिक संस्था कर : 301.50
वस्तू व सेवा कर (जीएसटी) : 1898.12
मिळकतकर : 950
गुंतवणुकीवर व्याज : 193.50
पाणी पट्टी : 94.82
बांधकाम परवाना : 520
अनुदाने : 303
भांडवली जमा : 624
इतर जमा : 78.73
एकूण : 5588.78

.
खर्च बाजू
सामान्य प्रशासन :  365.93
शहर रचना व नियोजन : 94.32
सार्वजनिक सुरक्षा व स्थापत्य : 2380.99
वैद्यकीय : 101.96
आरोग्य : 107.08
 शिक्षण : 222.05
उद्याने व पर्यावरण : 141.94
इतर सेवा : 605.49
पाणीपुरवठा : 437.07
करसंकलन : 92.52
शहरी गरिबी निर्मूलन व समाजकल्याण : 202.95
केंद्र सरकार निधी व अखेर शिल्लक : 834.04
एकूण : 5586.35

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com