Sakal Vastu Property Expo : घर घेण्यासाठी विविध पर्याय ग्राहकांसमोर एकाच ठिकाणी होणार उपलब्ध

साधारण वीस वर्षांपूर्वी पूर्णतः दुर्लक्षित असलेले रावेत, किवळे, मामुर्डी ही गावे आता प्रकाशझोतात आली आहेत.
Sakal vastu Property Expo
Sakal vastu Property ExpoSakal

पिंपरी - साधारण वीस वर्षांपूर्वी पूर्णतः दुर्लक्षित असलेले रावेत, किवळे, मामुर्डी ही गावे आता प्रकाशझोतात आली आहेत. महापालिकेत समाविष्ट झाल्यापासून विविध विकासकामे सुरू आहेत. रस्त्यांचे जाळे विणले आहे.

द्रुतगती मार्ग, महामार्गामुळे मुंबईकडील बाजूचे पुणे, पिंपरी-चिंचवडचे प्रवेशद्वार आणि पुणे-मुंबई या महानगरांना जोडणारे दुवा अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. तेथील गगनचुंबी इमारतींना नागरिकांची पसंती असून, स्वप्नातील घरे साकारली जात आहेत.

पवना नदीच्या काठावर रावेत व किवळे आहे. किवळेला लागूनच मामुर्डी आहे. पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीची उपनगरे अशी त्यांची ओळख. पवना नदीवरील रावेत बंधाऱ्यातून अशुद्ध जलउपसा करून शुद्ध केलेले पाणी शहरात वितरित केले जाते.

नदीवरील बास्केट ब्रीज अर्थात संत तुकाराम महाराज पूल, डॉ.‌ डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुल व किवळे येथील मुकाई चौकापर्यंत झालेला बीआरटीएस मार्ग, यामुळे रावेतची ओळख वाढली आहे. धर्मवीर चौकापासून बास्केट पुलापर्यंत अर्बन स्ट्रीट डेव्हलपमेंट योजनेंतर्गत रस्ता, पदपथ विकसित करून सुशोभीकरण केले आहे. हाच रस्ता पुढे किवळेपर्यंत रुंद केला आहे. दोन्ही बाजूला वृक्षारोपण आहे.

डी मार्ट रस्ता, एस. बी. पाटील स्कूल रोड, धर्मवीर चौक ते शिंदे वस्ती, शिंदे वस्ती ते बास्केट ब्रीज, शिंदे वस्ती ते किवळे विकासनगर लोहमार्गालगतचा रस्ता, इस्कॉन मंदिर रस्ता, बास्केट ब्रीज ते वाल्हेकरवाडी रस्ता हे रस्ते नव्याने विकसित केले आहेत.

निगडी भक्तिशक्ती चौक ते रावेत-किवळे जोडणाऱ्या बीआरटीएस मार्गावर शिंदे वस्ती येथे लोहमार्गावर उड्डाणपूल उभारण्याचे काम पूर्णत्वाकडे आहे. विविध आरक्षणे महापालिकेच्या ताब्यात आली असून विकासाची कामे सुरू आहेत.

रावेत, किवळे परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. सर्वांत आधी विकसित झालेला भाग आहे, त्याला बीआरटीची साथ मिळाली आहे. त्यामुळे अनेक गृहप्रकल्प उभारले जात आहेत. रस्त्यांमुळे कनेक्टिव्हिटी वाढली आहे. ‘सकाळ प्रॉपर्टी एक्स्पो’मुळे घर घेण्यासाठी विविध पर्याय ग्राहकांसमोर एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.

- रोहन गायकवाड, संचालक, बिवेगा रिॲलिटी

ताथवडे, पुनावळे, रावेत, किवळे भागात रस्त्यांचे मोठे जाळे आहे. शिवाय, या भागात घर घेण्यासाठी नागरिकांची मागणी वाढली आहे. आमच्या गृहप्रकल्पात विविध सुविधा असतील. उद्यान, जिम, क्लब हाउस, प्रशस्त वाहनतळ, प्ले एरिया आहे. प्रॉपर्टी एक्स्पोत एकाच छताखाली अनेक प्रकल्पांची आणि बॅंकांच्या कर्ज सुविधांची माहिती मिळेल.

- नरेश हंपीहोळी, उपाध्यक्ष, व्हिजन क्रिएटिव्ह ग्रुप

गावांची वैशिष्ट्ये

  • मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, मुंबई-बंगळूर महामार्ग अर्थात देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गामुळे गावांचे महत्त्व वाढले

  • द्रुतगती मार्ग किवळे व मामुर्डी येथूनच सुरू होतो, दोन्ही गावांच्या एका बाजूला पवना नदी व दुसऱ्या बाजूस देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड

  • रावेत, किवळे, मामुर्डी गावांचा १९९७ मध्ये महापालिकेत समावेश झाला, आता गावांचा झपाट्याने विकास होत आहे

  • काँक्रीटचे रुंद रस्ते, नवीन जलवाहिन्या, सांडपाणी वाहिन्या, पीएमपी बसथांबे, लोहमार्गालगतचा रस्ता विकसित होतोय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com