नवीन कायद्यानुसार पिंपरी चिंचवड महापालिका प्रभागरचना रद्द

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने तीन सदस्यीय प्रभागरचना तयार केली
Pimpri Chinchwad Municipal Corporation ward structure canceled as per new law
Pimpri Chinchwad Municipal Corporation ward structure canceled as per new lawsakal

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने तीन सदस्यीय प्रभागरचना तयार केली आहे. अंतिम मंजुरीसाठी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवली आहे. मात्र, त्यापूर्वीच राज्य सरकारने काढलेल्या आदेशामुळे प्रभागरचना रद्द झाली आहे. आता नवीन प्रभाग रचना कशी असेल?, नवीन कायद्यानुसार निवडणूक कशा पद्धतीने होणार?, राज्य सरकार काय निर्णय घेणार?

आगामी निवडणूक एक सदस्यीय, दोन सदस्यीय, तीन सदस्यीय अथवा की चार सदस्यीय प्रभाग रचनेनुसार याची उत्सुकता आहे. सरकारच्या निर्णयानुसार आगामी काळात महापालिकेत १३९ सदस्य असतील. निवडणूक किती सदस्य प्रभाग रचनेनुसार होणार, त्यावर प्रभागांची संख्या अवलंबून राहणार आहे.

महापौर कक्षासह विषय समित्या कार्यालये सील

पिंपरी-चिंचवड महापालिकेची मुदत रविवारी मध्यरात्री संपली. प्रशासक म्हणून आयुक्त राजेश पाटील यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. महापौर, उपमहापौर, पक्षनेता, विरोधी पक्षनेता, विषय समित्यांचे अध्यक्ष, प्रभाग समित्यांचे अध्यक्ष यांचे कक्ष सील करण्यात आले. त्यांची सरकारी वाहने महापालिकेत जमा केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com