

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Esakal
पिंपरी : महापालिका निवडणुकीत बंडखोरी टाळण्यासाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत अर्थात मंगळवारी (ता.३०) दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली नव्हती. थेट ए-बी फॉर्म वाटप करून अर्ज दाखल केले. शिवाय, बुधवारी (ता.३१) अर्ज छाननीच्या दिवशी रात्री नऊ वाजेपर्यंतही यादी प्रसिद्ध करण्याचे टाळले. अर्जांची छाननीही मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यामुळे भाजपने नक्की उमेदवारी कोणाला दिली, याबाबतचा ‘सस्पेन्स’ कायम होता. हीच खेळी त्यांच्या अंगलट आल्याचे प्रभाग २४ मध्ये दिसून आले. कारण, वेळ संपल्याचे कारण देत तीनही उमेदवारांचे ए-बी फॉर्म स्वीकारण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला होता.