Pimpri chinchwad : स्वतःचे भविष्य अंधारात ढकलून दिला मुलीच्या भविष्याला आकार

मुलीचे भवितव्य प्रकाशमान करणारी नवंदुर्गा
Pimpri chinchwad
Pimpri chinchwadsakal

वाकड : आई सारखा गुरू नाही असे म्हणले जाते! आयुष्यातील पहिला गुरू असणारी एक आई आपल्या मुलांसाठी वाट्टेल तो संघर्ष करते. मुलीला नेमबाजीत प्राविण्य करण्यासाठी ती गलेलठ्ठ पगाराची शासकीय नोकरी सोडते, मोठ्या जमीनदार, सुखवस्तू घराण्यातील ऐशो आरामाची जिंदगी त्यागुन, तिला आधार देत सुवर्ण कन्या बनवणाऱ्या वाकड मधील एका आदर्श आईची ही कहानी आहे.

सुचिस्मिता गांगुली असे त्या मातेचे नाव असून पश्चिम बंगालकडे नेमबाजीच्या क्षेत्रातील आवश्यक पायाभूत सुविधांची कमतरता असल्याने ४ वर्षांपूर्वी २३ वर्षीय सोहिनीला त्या पिंपरी-चिंचवड मधील वाकड येथे घेऊन आल्या. मात्र इथवर पोहचण्यापर्यंतचा प्रवास संघर्षमय आणि थक्क करणारा मात्र बिलकुल सोपा नव्हता गांगुली ह्यांचे पती बंगाल मधील सुप्रसिद्ध ह्रदयरोग तज्ञ आहेत. त्यामुुुळे सोहिनीच्या खेळाला आणि खेळातील करीअरला त्यांच्यासह संपूर्ण कुटुंबाचा कडाडून विरोध होता. तीने वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याबाबत त्यांचा आग्रह होता.

स्वतः सुचिस्मिता गांगुली ह्या बंगाल शासनाच्या एका ज्युनियर कॉलेजमध्ये प्राध्यापिका होत्या, सोहिनीला आवडीच्या क्षेत्रात करिअर करता यावं तीच्या खेळाला प्रोत्साहन मिळावे यातून तिने देशासाठी खेळावे म्हणून त्यांनी कुटुंबाचा विरोध झुगारला, नोकरीवर पाणी सोडत पुण्याची वाट धरलीउत्तम कामगिरीच्या जोरावर गगन नारंग संस्थेच्या शिष्यवृत्तीच्या आधारे सोहिनीला म्हाळुंगे-बालेवाडी स्टेडियममध्ये प्रशिक्षण सुरु करता आले.

नंतर स्लोव्हाकियातून कोच अँटोन बेलाक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण सुरु केले. २०१९ मध्ये तिला जर्मनीतील प्रतिष्ठित एमईसी नेमबाजी अकादमीने निवडल्याने ती जर्मन कोच हेन्झ रेनकेमीर आणि गॅबी बुहलमन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. आईच्या कष्टाची जाण ठेवून सोहिनी गांगुलीने देखील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेमध्ये अनेक सुवर्णपदके पटकाविले आहेत. तर २०२४ च्या ऑलम्पिकमध्ये ती देशाचे प्रतिनिधित्व करण्यास प्रबळ दावेदार असून देशासाठी सुवर्णपदक आणण्याचे स्वप्न उरी बाळगून ती प्रचंड मेहनत घेत आहे. या यशामागे आई सुचिस्मिता यांचा अतिशय खडतर संघर्ष व मोठा त्याग आहे.

सोहिनीचे आजोबा, मामा आणि आई राष्ट्रीय नेमबाज असल्याने ती देखील नेमबाजीकडे आकर्षित झाली. मेडिकल क्षेत्रात करिअर करण्याची संधी होती. वडिलांचा क्रीडा क्षेत्राला विरोधात असतानाही आवडीच्या नेमबाजी क्षेत्रातच भवितव्य घडविण्याचा निश्चय तिने केला त्यासाठी आईने मोठा त्याग करत समाज अन कुटुंबाच्या विरोधात जाऊन खंबीर साथ दिली.

प्रतिक्रिया

माझी गुरु, माझें आदर्श माझी आई आहे. ती मला प्रेरणा देते. माझी ताकद व आधारस्तंभ आहे. माझी मैत्रिण, मार्गदर्शक आणि तत्वज्ञानी आहे. तिने मला प्रोत्साहन दिले. मला तिच्यासारखीच एक स्वतंत्र विचारांची मजबूत स्त्री व्हायला शिकवले आहे. ती माझी खेळातील सर्वात मोठी चीअरलीडर आहे.

तिच्याशिवाय मी माझ्या स्वप्नांचा पाठपुरावा करू शकले नसते, तिने मला जीवनात नैतिकता आणि नितिमत्ता शिकवली आणि मी ते नेहमी माझ्या हृदयात आणि मनात ठेवून वागते. जेव्हा मी खेळ हा करिअरचा पर्याय म्हणून स्वीकारत वैद्यकीय क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली कुटुंबासोबत लढली, सर्वांच्या विरोधात जाऊन सर्व जबाबदारी तिच्यावर घेतली. तिची सुरक्षित नोकरी सोडली जिथे ती एक वरिष्ठ शिक्षिका होती.

सोहिनी गांगुली(आंतरराष्ट्रीय नेमबाज)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com