

Pimpri Chinchwad Municipal Corporation Nominated Corporators
Sakal
पिंपरी: स्वीकृत दहा नगरसेवक निवडीचा विषय सत्ताधारी भाजपकडून वेगवेगळ्या कारणांनी मागील दहा महिन्यांपासून सातत्याने लांबणीवर टाकण्यात आला. मात्र, येत्या २० नोव्हेंबरला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत भाजपकडून स्वीकृत नगरसेवकपदासाठी नावे दिली जातील, असे जवळपास निश्चित झाले आहे. हा तिढा अखेर सुटणार असून, राष्ट्रवादीच्या तीन जणांसोबत भाजपच्या सात जणांना ही संधी मिळणार आहे.