

Pimpri Chinchwad Candidate List
sakal
पिंपरी : राज्यात व केंद्रात सत्तेवर असलेली महायुती आणि विरोधात असलेली महाविकास आघाडी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी फुटली. त्यामुळे नवीनच समीकरणे शहरात निर्माण झाली असून शिवसेना, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पक्ष स्वतंत्र लढणार आहेत. मात्र, भारतीय जनता पक्ष १२८ पैकी १२३ जागांवर लढणार असून त्यांनी रिपब्लिकन पक्षाला (आठवले) पाच जागा सोडल्या आहेत. या व्यतिरिक्त कोणत्याही पक्षाला सर्व जागांवर उमेदवार देता आले नाहीत. मात्र, बंडखोरी टाळण्यासाठी व संभाव्य गणिते बिघडू नयेत, यासाठी कोणत्याही पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर न करता ऐनवेळी ए-बी फॉर्म दिले आहेत. त्यामुळे सर्वांची तारांबळ उडाली. धावपळ करत सर्वांनी वेळेत अर्ज दाखल केले.