

Pedestrian Road Safety
पिंपरी : वेगाने धावणारी वाहने, चालकांचे दुर्लक्ष, सिग्नल आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन तसेच रस्ते ओलांडताना होणारी घाई यामुळे पादचाऱ्यांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. शहरातील विविध भागांत पादचाऱ्यांना धडक बसून ते गंभीर जखमी होण्याच्या, तसेच जीव गमावण्याच्या घटना वाढत आहेत. या वर्षात जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांत कालावधीत १०० पादचाऱ्यांना जीव गमवावा लागला आहे.