Pimpri Chinchwad News : पिंपरी चिंचवडमध्ये कचरा संकलन विस्कळित, इंदूर पॅटर्नचा फज्जा

PMC Sanitation Fail : भोसरीतील प्रभाग चार व पाचमध्ये कचरा संकलनासाठी महापालिकेकडे जागा उरलेली नसल्याने रस्त्यावरच कचरा संकलन सुरू असून, नागरिक व व्यापाऱ्यांच्या विरोधामुळे स्वच्छता उपक्रमांवर पाणी फिरले आहे.
Pimpri Chinchwad News
Pimpri Chinchwad News Sakal
Updated on

भोसरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक चार आणि पाचमधील कचरा संकलनासाठी जागाच नाही. त्यामुळे रस्त्याच्या कडेला कॉम्पेक्टर वाहन थांबवून कचरा संकलित करण्याची वेळ महापालिकेच्या आरोग्य विभागावर आली आहे. काही भागांत दोन-दोन दिवसांनी घंटागाडी येत असल्याने नागरिक मोकळ्या जागेवर कचरा फेकत असल्याने महापालिकेच्या इंदूर पॅटर्न आणि स्वच्छ भारत अभियानाचा फज्जा उडाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com