Pimpri: ‘पीएमपी’च्या मर्यादा; खासगी वाहने सुसाट;बससंख्या अपुरी, दुपारी लोकल नाहीत अन् मेट्रोही ठरावीक; अपघातांच्या संख्येत वाढ

Insufficient PMPML Bus Fleet Affects Daily Commuters: पिंपरी-चिंचवडमध्ये पीएमपीएमएल वाहतूक मर्यादा, अपुरी बससंख्या आणि सार्वजनिक वाहतूक समस्या यामुळे नागरिक खासगी वाहनांकडे वळत आहेत.
Pimpri

Pimpri

esakal

Updated on

पिंपरी: पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपीएमएल) अपुरी बससंख्या, दुपारच्या वेळेस बंद असलेल्या लोकल आणि मेट्रोचा मर्यादित विस्तार त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीच्या वापरावर मर्यादा येत आहे. लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना सार्वजनिक वाहतूक सुविधा त्यातुलनेत सक्षम नाही. त्यामुळे नागरिकांना खासगी वाहनांकडे झुकणे भाग पडत आहे. खासगी वाहनांची संख्या २५ लाखांच्या घरात गेली आहे. त्यामुळे प्रदूषण, वाहतूक कोंडी, इंधनाचा अपव्यय आणि अपघातांची संख्या वाढली आहे. त्याचा पर्यावरणावर आणि पर्यायाने मानवी जीवनावरही गंभीर परिणाम होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com