

Twelve Housebreaking Cases Cracked Across Pimpri-Chinchwad
पिंपरी : सोमाटणे टोल नाका येथे मागील महिन्यात पोलिस पथकावर गोळीबाराचा प्रयत्न करणाऱ्या घरफोडीतील सराईत गुन्हेगाराकडून तपासादरम्यान बारा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. रावेत ठाण्याच्या हद्दीतील चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपी हिंजवडीत चोरी केलेली मोटार घेऊन सोमाटणे टोल नाक्यावर येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित मोटारीला अडवले.