

Pimpri-Chinchwad Police Enhance Preventive Action for Peaceful Elections
Sakal
पिंपरी : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी कंबर कसली आहे. सराईत गुन्हेगार, तडीपार आरोपी व समाजकंटकांची माहिती पोलिसांनी संकलित केली आहे. निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, मतदारांवर दबाव येऊ नये, तसेच मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी पोलिसांनी १ हजार ८५३ गुंडांची ‘कुंडली’ तयार केली आहे, तसेच मोठ्या प्रमाणात कारवाईवर भर दिला आहे.