PCMC Civic News : पिंपरी-चिंचवडमध्ये ३५ लाख लोकसंख्येसाठी केवळ २२७ सार्वजनिक स्वच्छतागृहे; महिला आणि दिव्यांगांच्या सुविधांचाही प्रश्न गंभीर

Public Toilet Shortage in Pimpri-Chinchwad: Only 227 Public Toilets for 3.5 Million People : पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या ३५ लाखांच्या घरात पोहोचली असताना सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या केवळ २२७ आहे. मूत्रालयांची संख्याही अपुरी असून महिला आणि दिव्यांगांच्या सुविधांबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
Public Toilet Shortage in Pimpri-Chinchwad: Only 227 Public Toilets for 3.5 Million People

Public Toilet Shortage in Pimpri-Chinchwad: Only 227 Public Toilets for 3.5 Million People

esakal

Updated on: 

पिंपरी : शहराची लोकसंख्या ३५ लाखांच्या घरात गेली असताना सार्वजनिक स्वच्छतागृहे केवळ २२७, तर मूत्रालये १०८ आहेत. त्यातही २७५ शौचालये सामुदायिक असल्याने घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांसाठी सार्वजनिक शौचालयांची संख्या केवळ २२७ आहे. एकूण आकडेवारीत सुविधा दिसत असल्या, तरी वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांच्या गैरसोईचा प्रश्न कायम आहे. गुरुवारी जागतिक शौचालय दिनानिमित्त सुविधांची संख्या, ठिकाणे आणि वापरयोग्यतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

Loading content, please wait...