
बेलाजी पात्रे
वाकड : आयटी पार्ककडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यांपैकी चिंचवड-डांगे चौक-भूमकर चौक-हिंजवडी हा प्रमुख रस्ता आहे. त्याचे रुंदीकरण वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरेल. महापालिका आणि एमआयडीसी प्रशासन हा रस्ता करत आहेत. या रस्त्याच्या रुंदीकरणामुळे आयटी कर्मचारी, विद्यार्थी आणि स्थानिक रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.