Pimpri Chinchwad RTO : पिंपरी चिंचवड आरटीओच्या रडार यंत्रणेमुळे सात महिन्यांत १० हजार ७१३ वाहनचालकांवर कारवाई; ८९ कोटींहून अधिक दंड आकारला

Radar Interceptor Vehicles Crack Down on Traffic Violations : पिंपरी चिंचवड आरटीओच्या रडार यंत्रणा असलेल्या इंटरसेप्टर वाहनांद्वारे सात महिन्यांत १० हजार ७१३ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून सुमारे ८९ कोटी २४ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
Radar Interceptor Vehicles Crack Down on Traffic Violations

Radar Interceptor Vehicles Crack Down on Traffic Violations

esakal
Updated on: 

पिंपरी : पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाच्या ताफ्यात दाखल झालेल्या अत्याधुनिक ‘रडार’ यंत्रणा असलेल्या इंटरसेप्टर वाहनांच्या माध्यमातून सात महिन्यांत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० हजार ७१३ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर सुमारे ८९ कोटी २४ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यात दुचाकीचालक टॉपला असल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...