'स्मार्ट सिटी'मध्ये पिंपरी-चिंचवडची राज्यात झेप 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 December 2020

'स्मार्ट सिटी' प्रकल्पाच्या राज्यस्तरीय यादीमध्ये पिंपरी-चिंचवड शहराने चौथ्या क्रमांकावरून दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.

पिंपरी : 'स्मार्ट सिटी' प्रकल्पाच्या राज्यस्तरीय यादीमध्ये पिंपरी-चिंचवड शहराने चौथ्या क्रमांकावरून दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. स्मार्ट सिटीत तिसऱ्या टप्प्यात सहभागी होऊनही शहराचे रॅंकिंग वाढत आहे. गेल्या काही महिन्यांपासून स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत होत असलेल्या कामांमुळे शहराला दुसरे स्थान मिळविता आले आहे. तर, पुणे शहराचा पहिला क्रमांक आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

याबाबतची माहिती स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने राज्यस्तरीय यादी जाहीर केली आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या प्रकल्पांची संख्या, चालू प्रकल्प, निविदा टप्प्यातील प्रकल्प, डीपीआर टप्प्यातील प्रकल्प आणि वापरलेल्या निधीची रक्कम याचा आधार घेऊन हे रॅंकींग देण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या देखरेखीखाली शहरात विविध प्रकल्पांची कामे सुरू आहेत. कोरोना काळातही शहरात स्मार्ट सिटीची कामे चालू होती. प्रकल्पांच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केले. त्यामुळे राज्यातील नऊ शहरात पिंपरी-चिंचवडने दुसऱ्या क्रमाकांवर झेप घेतली असून, ही सुधारणा शहराला चालना देणारी आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

"स्मार्ट सिटीअंतर्गत झालेले काम आणि खर्च यानुसार रॅंकिंग काढले आहे. शहरातील सर्व कामांच्या निविदा झाल्या आहेत. कामे सुरू आहेत. त्यामुळे शहराचा रॅंकिंगमध्ये नंबर वाढत आहे. राज्यातील नऊ शहरांमध्ये पिंपरी-चिंचवड दुसऱ्या क्रमांकावर आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत कामांसाठी 350 कोटींच्या आसपास खर्च झाला आहे. सर्व कामे चालू आहेत. त्यामुळे खर्च होत आहे. इतर शहरांचा दुसऱ्या टप्यात स्मार्ट सिटीत समावेश झाला. मात्र, पिंपरी-चिंचवडचा तिसऱ्या टप्प्यात समावेश झाला. सर्वांत शेवटी सहभाग होऊनही सर्व निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे. कामांचे कार्यरंभ आदेश दिले आहेत. फिल्डवर कामे सुरू आहेत. त्यामुळे जसे प्रकल्प संपत जातील. तसतसे शहराचे रॅंकिंग वाढत जाईल." 
- श्रावण हर्डीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri chinchwad second ranks in smart city