
पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पीसीएमसी स्मार्ट सारथी उपक्रमाला 'ई- गर्व्हनन्स अँड इकोनॉमी' पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
पिंपरी - स्मार्ट सिटी मिशन (Smart City Mission) अंतर्गत भारत सरकारचे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय निर्माण भवन, नवी दिल्ली यांच्यावतीने आयोजित '७ व्या स्मार्ट सिटीज इंडिया २०२२' आणि '२९ व्या कन्व्हर्जन्स इंडिया २०२२' एक्स्पोमध्ये पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पीसीएमसी स्मार्ट सारथी उपक्रमाला 'ई- गर्व्हनन्स अँड इकोनॉमी' (E-Governance and Economy) पुरस्काराने (Award) गौरविण्यात आले आहे. बिहार राज्याचे माहिती व तंत्रज्ञान मंत्री जिबेश कुमार, वीज मंत्रालयाचे सहसचिव अंजु भल्ला यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील यांनी हा पुरस्कार स्विकारला. या पुरस्काराने पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकीकात भर पडली आहे.
दि. २३ ते २५ मार्च २०२२ या दरम्यान प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन (ITPO) द्वारे देशातील १०० स्मार्ट सिटींसाठी एक्सो भरविण्यात आला होता. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी प्रकल्प, उपक्रम आणि उपलब्धी दाखवण्यासाठी डिस्प्ले स्टॉल लावण्यात आला आहे. स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण यांच्या नेतृत्वाखाली स्मार्ट सिटीचे विवेक पाटील, सीटीओ टीमच्या ऋतुजा करकरे यांनी सहभाग नोंदविला होता.
कोविड काळात प्रशासनाची महत्त्वाची भूमिका, माहिती गोळा करण्यासाठी अनेक नवकल्पनांचा आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा केलेला वापर, द्वि-मार्गी संप्रेषणाची तरतूद, व्यवस्थापन आणि समन्वय, भविष्य सूचक मॉडेलिंग आणि सज्जता, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तसेच कॉर्पोरेट क्षेत्रांना होणारा तंत्रज्ञानाचा फायदा, स्टार्टअप्स मिळणारे प्राधान्य, नागरिकांना राहण्यायोग्य आणि शाश्वत शहरे निर्माण करण्यासाठी योग्य उपाययोजना, स्मार्ट शहराची संकल्पना, तसेच, सिटी लीडर्स कॉन्क्लेव्हमध्ये शहरी स्मार्ट सिटी सोल्यूशन्स व स्मार्ट सिटीज इन्फ्रास्ट्रक्चर, स्मार्ट सिटी फ्रेमवर्कसह स्मार्ट आयसीटी, स्मार्ट एनर्जी, बिल्डिंग्स, ट्रान्सपोर्ट, वॉटर आणि क्लीन इंडिया इ. इंडस्ट्री यासह शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य बनवून प्रभाव पाडणाऱ्या प्रकल्पांचे व्हीडीओद्वारे या तीन दिवसीय एक्स्पोमध्ये सादरीकरण करण्यात आले होते.
तसेच, पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना वेळेत व सातत्यपूर्ण माहिती मिळण्यासाठी महापालिकेच्यावतीने पीसीएमसी स्मार्ट सारथी ऍप उपलब्ध् करून देण्यात आले आहे. या माध्यमातून, युटिलिटी अपडेट्स, ऑनलाइन कर भरणे, ऑनलाइन प्रमाणपत्रे तसेच ऑनलाईन तक्रार निवारण सेवा देण्यात येते. नागरिक पीसीएमसी कार्यालयात न जाता तक्रारीची स्थिती जाणून घेऊ शकतात. तसेच, जीपीएस वापरून जवळपासची सरकारी कार्यालये, रुग्णालये, शाळा, सार्वजनिक शौचालये, रक्तपेढ्या, उद्याने, सीएफसी सेंटर शोधू शकतात. त्याचबरोबर, व्यापारी, भागीदारी संस्था, आरोग्य सेवा प्रदाते/ रुग्णालये आणि क्लब, स्थानिक विक्रेते, व्यवसाय आणि ठिकाणे यांच्यासाठी पीसीएमसी स्मार्ट सारथी उपयुक्त् ठरत आहे. नागरिकांना वेळेत सोयी- सुविधा उपलब्ध करण्यासाठी लाभदायी ठरत असलेल्या पीसीएमसी स्मार्ट सारथी उपक्रमाला एक्स्पोच्या शेवटच्या दिवशी २५ मार्च २०२२ रोजी स्मार्ट सिटीज इंडियाद्वारे “ई- गर्व्हनन्स अँड इकोनॉमी” पुरस्कार म्हणून घोषणा करण्यात आली.
दरम्यान, देश-विदेशातील उद्योग संस्था, महाविद्यालये, उद्योग क्षेत्रातील नामवंत कंपन्यांच्या प्रतिनिधींनी पिंपरी चिंचवड महापालिका व स्मार्ट सिटीच्या स्टॉलला भेट देवून प्रकल्पांची माहिती घेतली. देशभरातून शंभर स्मार्ट सिटीजने सहभाग नोंदवून १ हजारहून अधिक स्टॉल लावण्यात आले होते. शहरी समस्यांचे निराकरण करण्यासाठी सखोल संवाद आणि अधिक व्यावहारिक दृष्टीकोन, स्मार्ट शहरे प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने काम करणाऱ्या संस्थांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणारे व्यासपीठ उपलब्ध होण्यासाठी तीन दिवसीय एक्स्पो भरविण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.