Pimpri chinchwad : सोसायटी पदाधिकाऱ्यांच्या कचरा व्यवस्थापन

कार्यशाळेला महापालिका अधिकाऱ्यांची पाठ
Pimpri chinchwad
Pimpri chinchwadsakal

वाकड : शहरातील सोसाट्यांचा ओला कचरा समस्येबाबत सोसायसाठी पदाधिकारयांसाठी महापालिकेच्या वतीने ओला कचरा व्यवस्थापन यावरील कार्यशाळेचे शनिवारी सांगवी येथील निळू फुले सभागृहात ११ ते १ या वेळेत आयोजन करण्यात आले होते. मात्र साडे बारा पर्यंत एकही अधिकारी येथे न फिरकल्याने सोसायटी रहिवाशांनी सभा त्याग करत महापालिकेचा निषेध केला.

या कार्य शाळेला महापालिका आयुक्त शेखर सिंह व संबंधित विभागाचे अन्य अधिकारी मार्गदर्शन करणार होते. कार्यशाळेची वेळ ११ ते १ अशी होती त्यास सुट्टीच्या दिवशी शहरातील सुमारे तीसहुन अधिक सोसायट्यांचे पदाधिकारी वेळ काढून साडे दहा वाजताच हजर झाले होते मात्र, १२.३० पर्यंत एकही अधिकारी सभागृहात उपस्थित न राहिल्याने सोसायटी पदाधिकाऱ्यांनी महापालिकेचा निषेध करत काढता पाय घेतलारागाने घर गाठले.

सोसाट्यांच्या कचरा समस्येबाबत महापालिकेला गांभीर्य नाही आता तर या अधिकाऱ्यांना सोसायटी धारकांच्या वेळीचीही किंमत नाही त्यांना आमचे कसलेही सुख दुःख नाही. आता पिंपरी-चिंचवड मधील सर्व सोसायटीधारकांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे सोसायट्यात एकी नसल्याने महापालिकेकडून अशी दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात आहे असे पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशचे अध्यक्ष दत्तात्रय देशमुख यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com