मुलचंदानी आणि आसवानी दोन्ही गटांची एकमेकांवर आरोपांची राळ

पिंपरीतील सेवा विकास सहकारी बँकेचा परवाना सोमवार ( ता. १०) भारतीय रिझर्व्ह बँकेने रद्द केला.
The Seva Vikas Bank
The Seva Vikas BankSakal
Summary

पिंपरीतील सेवा विकास सहकारी बँकेचा परवाना सोमवार ( ता. १०) भारतीय रिझर्व्ह बँकेने रद्द केला.

पिंपरी - पिंपरीतील सेवा विकास सहकारी बँकेचा परवाना सोमवार ( ता. १०) भारतीय रिझर्व्ह बँकेने रद्द केला. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आसवानी बंधू व भाजपचे अमर मुलचंदानी यांनी पत्रकार परिषद घेवून एकमेकांवर आरोपांची राळ बुधवारी (ता. १२) उठविली. बँकेचा इतिहास पाहिला तर; या दोन्ही गटांचा सत्तेसाठीचा अहंमपणा व महत्वकांक्षाच बँकेचा परवाना रद्द होण्यास कारणीभूत असल्याचे निदर्शनास येत आहे.

मुलचंदानी व त्यांच्या सहकारी संचालकांवर मोक्कांतर्गत कारवाई करा - डब्बू आसवानी

दरम्यान, सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष ॲड. अमर मुलचंदाणी आणि त्यांचे सहकारी संचालक यांनी दि. सेवा विकास सहकारी बँकेत संगणमताने बेकायदेशीररित्या, आर्थिक गैरव्यवहार करून बँकेला आर्थिक संकटात टाकले आहे. परिणामी बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेने कारवाई केली आणि बँकेचा परवाना दोन दिवसांपूर्वी रद्द केला. या सर्व घटनेला माजी अध्यक्ष ॲड. मुलचंदाणी आणि त्यांचे सहकारी संचालक हे जबाबदार असून त्यांच्यावर सरकारने मोक्कांतर्गत कारवाई करावी. तसेच सह निबंधक (लेखा परीक्षण) राजेश जाधवर यांच्या चाचणी लेखापरीक्षण अहवालातील ४२९ कोटी रुपयांच्या कर्ज वितरणाची वसुली मुलचंदाणी आणि व त्यांच्या सहकारी संचालक मंडळांकडून वसूल करावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांनी आज पत्रकार परिषदेत केली. यावेळी उद्योजक श्रीचंद आसवानी उपस्थित होते. मुलचंदानी व त्यांच्या सहकारी संचालकांची सक्त वसूली संचलनालय (ई. डी.) व आयकर (आय. टी.) विभागाने चौकशी करावी, अशी मागणी श्रीचंद आसवानी यांनी केली.

आसवानी बंधूंच्या कारवायांमुळेच बँक बंद पडली - अमर मुलचंदानी

अमर मुलचंदानी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, बँकेच्या कथित गैरव्यवहारांबाबत चौकशी सुरु आहे. काही प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत. अनेक वर्षांपासून बँकेचे काम व्यवस्थित चालले होते. परंतु; आसावनी बंधूंनी कारवाया केल्यामुळे बँक बंद पडली व सुमारे ३०० कर्मचारी बेकार झाले. त्यांनी पत्रकारांना २०१९ चा रिझर्व्ह बँकेच्या अहवालातील पत्र दाखविले. यामध्ये बँकेत गैरव्यवहार नसल्याचे नमूद असल्याचा दावा त्यांनी केला. माझ्यावर चुकीचे गुन्हे दाखल केल्यामुळेच मला न्यायालयाने जामिन मंजूर केला व अटकेपासून संरक्षण दिले, असेही त्यांनी सांगितले. यावेळी बँकेतील सुमारे १५० कर्मचारी त्यांना भेटावयास आले. कर्मचाऱ्यांनी बँकेच्या मुख्य इमारतीच्या समोर बँकेचा परवाना रद्द केल्याच्या निर्णयाच्या विरोधात निदर्शनेही केली.

श्रीचंद आसवानी व डब्बू आसवानी यांनी राजकारणापाई बँकेची बदनामी करून लोकांना बँकेतील ठेवी काढायला लावल्या. आपण मिळून बँक वाढवू असे खोटे आश्‍वासन देवून फसवणूक करून मला राजीनामा द्यायला लावला. मी भाजपचा असल्याने राष्ट्रावादीच्या आसवानी बंधूनी सत्तेचा गैरवापर करुन बँक संपवली व सुमारे ३०० कर्मचाऱ्यांना रस्त्यावर आणले. यामुळे सिंधी समाजाचे मोठे नुकसाण झाले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांचे असे सर्वांचे नुकसाण झाले.

- अमर मुलचंदानी, माजी अध्यक्ष, सेवा विकास बँक.

२००९ मध्ये अमर मुलचंदानी यांच्या ताब्यात बँक गेली, त्या आधी आम्ही बँकेच्या १५ शाखा काढल्या होत्या व त्या सर्व नफ्यात होत्या. मुलचंदानी यांनी त्यानंतर १० शाखा काढल्या त्या सर्व तोट्यात होत्या. मुलचंदानी ठेवी १००० कोटींपर्यंत नेल्याचे सांगतात. परंतु; ते खोटे आहे. त्या फक्त ६५० कोटींपर्यंतच होत्या. १० लोकांमध्येच यांनी सुमारे २०० ते २५० कोटींचे कर्ज वाटप केले, त्यांनी ते न फेडल्याने बँक तोट्यात गेली. बँक तोट्यात असाताना हे नफ्यात दाखवत होते.

- हरेश आसवानी, माजी अध्यक्ष, सेवा विकास बँक.

सेवा विकास बँकेत झालेल्या चुकीच्या कारभाराची चौकशी झाली आहे. त्याचा लेखा परिक्षण अहवाल (ऑडीट रिपोर्ट) आला आहे. बँकेत मुलचंदानी यांच्या कुटुंबियांचीच एकाधिकारशाही सुरू होती. ती इतर संचालकांनाही मान्य नव्हती. आता चुकीच्या कारभारावर कारवाई सुरू होता. मुलचंदानी यांनी आमच्या कुटुंबावर केलेले सर्व आरोप चुकीचे आहेत. हे आरोप केवळ द्वेषभावनेतून केले जात आहेत.

- राजू आसवानी, याचिकाकर्ते.

दोन्ही गटांचा अहंमपणा व महत्वकांक्षा नडली

सेवा विकास बँकेने शहरातील अनेक उदयोन्मुख उद्योजक व व्यापाऱ्यांना मदत केली. त्यामुळे बँक अल्पावधीत नावारुपाला आली. पिंपरी कॅम्प व परिसरातील व्यापाऱ्यांवर मांड ठोकण्यासाठी ही बँक एक चावी होती. बँकेत अमर मुलचंदानी व हरेश आसवानी म्हणजेच आसावनी बंधू यांचा गट असे दोन प्रबळ गट होते. परंतु; २००८ मध्ये एका संचालकास फोडून आसवानी गटाच्या ताब्यातील बँक मुलचंदानी यांनी आपल्याकडे खेचून आणली. त्यानंतर २०१० च्या निवडणुकीत राजकीय खेळ्या करत आसवानी गटाचे चार अर्ज बाद करुन पुन्हा मुलचंदानी यांनी सत्ता हस्तगत केली.

२०१५ मध्ये संचालक पदासाठी अर्ज भरण्याची अर्हता किमान पदवीधर शिक्षण व किमान २५ हजार भाग (शेअर्स) असणे अशी मुलचंदानी यांनी करुन घेतली. त्यामुळे आसवानी गटाचे दिग्गज संचालक पदाला अर्जच भरु न शकल्याने मुलचंदानी यांचे संपूर्ण संचालक मंडळ बिनविरोध आले. २०२० मध्ये बँकेची निवडणूक होणे अपेक्षित होते. परंतु; कोरोनामुळे जुन्याच संचालक मंडळास वाढ मिळाली. सत्तेतून बेदखल झालेल्या आसावनी बंधूंनी अनेक प्रयत्न केले. अखेर महाविकास आघाडी २०१९ मध्ये सत्तेत अल्यावर पालीस यंत्रणा हाताशी धरुन मुलचंदानी यांच्या भोवती आसवानी गटाने फास आवळले. दोन्ही गटात शहरातील भाजपच्या एका दिग्गज नेत्याने समेट घडवून आणला. त्यानंतर मुलचंदानी यांनी व काही संचालकांचा २०२० मध्ये राजीनामा देवून विजय रामचंदानी यांना अध्यक्ष केले. परंतु; समेट अयशस्वी झाला व सप्टेंबर २०२१ मध्ये बँकेवर प्रशासक नेमले गेले.

दरम्यान; मुलचंदानी यांच्यावर १७ गुन्हे दाखल झाले व त्यांना अटक झाली. मुलचंदानी यांची आई वारल्यानंतर त्यांना पॅरोलची १० दिवसांची रजा मिळाली. त्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल होवून हृदयाची शस्त्रक्रिया करुन घेतली. पोलीसांचा पुन्हा अटक करण्यासाठी पहारा असताना मुलचंदानी यांनी सिनेस्टाईल पलायन केले व ते भूमिगत झाले. त्यानंतर अटकपुर्व जामिन व न्यायालयाचा अटक न करण्याचा आदेश घेवूनच मुलचंदानी शहरात दाखल झाले. परंतु; या सर्व गदारोळात बँकेचा रिझर्व्ह बँकेने परवाना रद्द केला व शहरातील विकासाला चालना देणाऱ्या चांगल्या बँकेचा दोन्ही गटांच्या अहंमपणा व महत्वकांक्षेपायी ऱ्हास झाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com