
पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीतील अपघातांच्या घटनांमध्ये रस्त्यावरून सुसाट धावणाऱ्या अवजड वाहनांनी दिलेल्या धडकेत दुचाकीस्वारांचा मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. अशा घटना रोखण्यासह वाहतूक सुरळीत राहण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी शहरातील बहुतांश रस्त्यांवरून सकाळी व सायंकाळी जड, अवजड वाहनांना प्रवेश मनाई केली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाईदेखील केली जात आहे. मात्र, तरीही शहरातील अनेक रस्त्यांवरून सकाळ, सायंकाळी गर्दीच्या वेळी जड, अवजड वाहने सुसाट धावत आहेत. अशा बेशिस्त अवजड वाहनांमुळे अनेकांना जीव गमवावा लागला अाहे. त्यामुळे या वाहनचालकांना पोलिस शिस्त लावणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात अाहे.