
पिंपरी : मोबाईल कानाला लावून वाहन चालविणारे चालक मार्गावर पाहायला मिळतात. मात्र, मोबाईलमुळे लक्ष विचलित होऊन अपघात झाल्यास वाहन चालकासह समोरच्या व्यक्तीच्याही जिवाला धोका निर्माण होतो. दरम्यान, पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी अशा बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मागील वर्षभरात १९ हजार ३४५ वाहन चालकांवर कारवाई केली आहे.