Pimpri Chinchwad Noise: कर्णकर्कश सायलेन्सरवर ‘रोडरोलर’; पिंपरी-चिंचवड पोलिसांची ३६८ दुचाकींवर धडक कारवाई

Traffic Police: पिंपरी-चिंचवडमध्ये दुचाकींच्या नियमबाह्य सायलेंसरमुळे नागरिक त्रस्त आहेत. पोलिसांनी तीन दिवसांत ३६८ सायलेंसर काढून रोडरोलरखाली नष्ट केले. या कारवाईत ध्वनी प्रदूषण कमी करण्यावर आणि रस्त्यांवरील सुरक्षिततेवर भर दिला गेला.
Pimpri Chinchwad Noise

Pimpri Chinchwad Noise

sakal

Updated on

पिंपरी : हवा, जल आणि ध्वनी प्रदूषणाने पिंपरी-चिंचवडचे नागरिक त्रस्त आहेत. याबाबत ‘सकाळ’ने ‘गुदमरतोय श्वास’ या वृत्तमालिकेच्या माध्यमातून प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष वेधले. त्याची दखल घेत पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी तीन दिवसांत ३६८ दुचाकीस्वारांवर कारवाई केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com