PCMC : पिंपरी चिंचवडमध्ये शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी महापालिका वाढविणार जलस्रोत; महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नव्या वर्षातील जलनियोजनाची माहिती दिली

Pimpri Chinchwad Water Supply: PMC Plans to Expand Water Resources : पिंपरी चिंचवडच्या वाढत्या लोकसंख्येची पाण्याची गरज भागविण्यासाठी महापालिका जलस्रोत वाढविणार आहे. २०५१ पर्यंत २,४०० एमएलडी पाणी उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट असून जलवाहिन्या, पाणीगळती नियंत्रण आणि सांडपाणी पुनर्वापरावर भर दिला जाणार आहे.
Pimpri Chinchwad Water Supply: PMC Plans to Expand Water Resources

Pimpri Chinchwad Water Supply: PMC Plans to Expand Water Resources

esakal

Updated on: 

पिंपरी : ‘‘पिंपरी चिंचवडच्या विकासाचा पुढचा टप्पा घडविताना वाढत्या लोकसंख्येच्या गरजा आणि नैसर्गिक साधनसंपत्ती यांचा समतोल साधणे आवश्यक आहे. त्यासाठी पाणीपुरवठा, जलनिःसारण, रस्ते, स्वच्छता, वाहतूक, आरोग्य आणि शिक्षण या पायाभूत सेवांचा एकत्रित विचार करून नव्या वर्षातील नियोजन करण्यात येत आहे. यात ‘पाण्याचे शाश्‍वत नियोजन’ प्राधान्यक्रमात असून सर्व नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी जलस्रोत वाढीवर भर दिला आहे,’’ असा विश्‍वास महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.

Loading content, please wait...