esakal | Pimpri: सफाई कामगारांना सानुग्रह अनुदानापासून वंचित
sakal

बोलून बातमी शोधा

सफाई कामगार

पिंपरी : सफाई कामगारांना सानुग्रह अनुदानापासून वंचित

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : महापालिका प्राथमिक शाळांमधील सफाई कामगारांना सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी नॅशनल वर्कर्स फेडरेशनने केली आहे. याबाबत फेडरेशनने आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे निवेदन दिले आहे.

आयुक्तांना दिलेल्या निवेदनात अध्यक्ष सचिन साबळे यांनी म्हटले आहे की, ‘‘महापालिकेच्या शाळेत सफाई कामांसाठी ८५ सफाई कामगार कार्यरत आहेत. गेल्या १७ वर्षापासून या कामगारांना कोणत्याही दिवाळी व सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळाला नाही. फेडरेशन आणि महापालिका यात न्यायालिन वाद होते.

हेही वाचा: मुंबई : पालिकेच्या वनाला सिनेमा, कॉर्पोरेटलाही मोह

परंतू आता फेडरेशनच्या बाजूने निकाल लागला आहे. न्यायालयाने ३१ जुलै २०२१ रोजी आदेश दिले होते. परंतू शिक्षण विभागाने न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नाही. पण अद्याप शिक्षण विभागाकडून कुठलिही कार्यवाही करण्यात आली नाही. तसेच महापालिकेच्या कामगार कल्याण मंडळाने या कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू केले आहे. किंबहूना आदेश दिलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्या मानधनात वाढ केलेली नाही. कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या कामगारांना दिवाळी आधी सानुग्रह अनुदान व थकित वेतन लवकरातलवकर कामागारांना द्यावेत. तसेच दिलेल्या आदेशाचे पालन न करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी फेडरेशनने केली आहे.

loading image
go to top