Pimpri Crime : ....अखेर गुंडा विरोधी पथकाने भानू खळदेच्या मुसक्या आवळल्या

किशोर आवारेंच्या खुनानंतर आरोपी भानू खळदे होता फरार.
Bhanu Khalade
Bhanu Khaladesakal
Updated on

पिंपरी - किशोर आवारे यांच्या खुन प्रकरणातील फरार आरोपी माजी नगरसेवक चंद्रभान उर्फ भानू विश्वनाथ खळदे याला गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने नाशिकमध्ये बेड्या ठोकल्या. मागील ५६ दिवसांपासून खळदे पोलिसांना गुंगारा देत होता.

जनविकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांची १२ मे रोजी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या इमारतीत हत्या करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी अवघ्या काही तासात मारेकरी शाम निगडकर, प्रविण धोत्रे, आदेश धोत्रे, संदीप मोरे, श्रीनिवास शिडगल यांच्यासह मनिष यादव या रेकॉर्डवरील सराईतांना अटक केली.

मात्र, याप्रकरणात आवारे यांच्या खुनाची सुपारी दिली म्हणून भानू खळदे याच्या मुलाचे नाव पुढे आल्याने पोलिसांनी गौरव चंद्रभान खळदे (वय २९) याला काही दिवसांनी अटक केली.

मुलाला अटक झाल्याचे समजताच भानू खळदे फरार झाला होता. मागील ५ दिवसांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. दरम्यान, आवारे खुनाचा तपास करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) ची स्थापना केली.

यासह गुंडा स्कॉड, गुन्हेशाखा युनिट पाच आणि अन्य गुन्हेशाखेची पथके आरोपींच्या मागावर होती. खळदे खंडाळा, दौंड, हैदराबाद आणि नाशिक जिल्ह्यातील सिंधी कॉलनीत वास्तव्याला असल्याची माहिती गुंडा स्कॉडचे प्रमुख, सहायक पोलीस निरीक्षक हरिष माने यांना समजली. त्यानुसार, पथकाने खळदे याला अटक केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.