भांडणाच्या रागातून एकाचा गळा आवळून खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pimpri crime update murder from old dispute three arrested

भांडणाच्या रागातून एकाचा गळा आवळून खून

पिंपरी : दारू पिताना झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एकाचा गळा आवळून खून केला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही घटना आळंदी येथे घडली. दीपक (वय ४५) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी माधव अतऋषी साबळे (वय ३०, रा. सध्या इंद्रायणी घाटावर आळंदी, मूळ- मु. पो. जांबअंध. ता. सेनगाव. जि. हिंगोली), सुधाकर उर्फ बंटी बबन वाघमारे (वय ३०, रा. सध्या इंद्रायणी घाटावर आळंदी, मूळ- हिंगलजवाडी, जि. उस्मानाबाद, ज्ञानेश्वर पुंडलिक शिंदे (वय ५६, रा. सध्या इंद्रायणी घाटावर आळंदी , मूळ- मु. पो. हाडूलकी, ता. अहमदपूर, जि. लातूर) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

इंद्रायणी नदी घाटावर जेवण करताना दारू पिण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी दीपक यांना जबर मारहाण केली. त्यानंतर कशाच्या तरी सहाय्याने गळा आवळून त्यांचा खून केला. त्यांचा मृतदेह इंद्रायणी नदी घाटाजवळील संत गुलाबराव महाराज ट्रस्ट शेजारील पदपथावर आढळला. हा प्रकार रविवारी (ता.८) साडे नऊ ते सोमवारी (ता. ९) सकाळी नऊ या कालवधीत घडला. दिघी पोलिसांनी आरोपींना चार तासातच अटक केली.

Web Title: Pimpri Crime Update Murder From Old Dispute Three Arrested

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top