

Cyber Police Bust Interstate Gang Supplying Fake SIM Cards to Cybercriminals
sakal
पिंपरी : चिनी नागरिकांच्या मदतीने दुबईतून भारतीय नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांना १० ते १२ हजार बनावट मोबाइल सिमकार्ड पुरवणाऱ्या दोन आरोपींना पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी अटक केली. यामुळे आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला आहे. आतापर्यंत मुख्य सूत्रधारासह सात आरोपींना अटक झाली आहे. यापैकी दोघांनी २५ ते ३० वेळा दुबईला जाऊन मुख्य सूत्रधाराला सिमकार्ड पुरवल्याचे उघड झाले. त्यांना सिमकार्ड विक्री करणाऱ्या दोघांना मुंबई, ठाण्यातून अटक करण्यात आली.