

Dairy Farm Flyover Reduces Traffic Congestion but Raises Road Safety Concerns
esakal
पिंपरी : पिंपरी कॅम्पातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मिल्ट्री डेअरी फार्म येथे लोहमार्गावर महापालिकेने उड्डाणपूल उभारला आहे. पाच नोव्हेंबर रोजी तो रहदारीसाठी खुला केला. मात्र, पुणे-मुंबई महामार्ग ओलांडून जाण्या-येण्यासाठी लूप किंवा भुयारी मार्ग नसल्याने विरुद्ध दिशेने (रॉंग साइड) वाहनचालक ये-जा करत असल्याने व तीव्र उतार आणि वळण असल्याने अपघाताचा धोका संभवतो. त्यावर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.