esakal | Pimpri: मोकाट घोडे, कुत्रे रस्त्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी : मोकाट घोडे, कुत्रे रस्त्यावर

पिंपरी : मोकाट घोडे, कुत्रे रस्त्यावर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : मोकाट डुकरे, कुत्रे रस्त्यावर फिरत असल्याचे ज्ञात होते. परंतु ऐन रहदारीच्या वेळेस पाच ते दहा मोकाट घोड्यांचे कळप रस्त्यावर आल्याने वाहनधारकांना बराच त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रारी पशुवैद्यकीय विभागाकडे येऊ लागल्या आहेत. महापालिकेने फिरता कोंडवाडा वाहनांमधून संबंधित मालकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

शासनाने निर्बंध शिथिल केल्यामुळे नागरिक आपल्या व्यवसायासाठी व नोकरीसाठी बाहेर पडत आहे.अशा वेळी भर रस्त्यातच जनावरे व श्‍वानांबरोबरच मोकाट घोड्यांचा कळपही पहावयास मिळतात. ती मंडळी नागरिकांना व वाहनांनाही घाबरत नाहीत. नागरिकांनी हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला तर वेळप्रसंगी मोठ्याने किंचाळतात. वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन वाहन रस्त्याच्याकडेने चालवावे लागते. अशावेळी अपघात होण्याची दाट शक्यता असते. मोकाट घोड्याबरोबरच, कुत्री व जनावरांचाही धोका वाहनचालकां बरोबरच ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांनाही आहे. असे अनेक ठिकाणी सायंकाळच्यावेळी मोठ्या घोड्याचे टोळके प्रमाणात पहावयास मिळत असल्याचे मुरलीधर दळवी यांनी सांगितले.

हेही वाचा: गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगिता पिपरे अपात्र घोषित

स्थानिक विकास शहाणे म्हणाले, ‘‘सध्या नवी सांगवी परिसरात पाच ते दहा मोकाट घोडे रस्त्याच्या मधोमध उभी राहिलेली असतात. त्यामध्ये वळू (पोळ) पण असतात. महापालिकेच्या स्मार्ट सिटीअंतर्गत सगळीकडे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम चालू आहे. त्यामुळे वाहन चालवणे कठीण झाले आहे. त्यातच पावसाळी दिवस असल्यामुळे रस्ते निसरडे झाले आहेत.’’

संगीता जोगदंड म्हणाल्या, ‘‘महापालिकेने अशा मोकाट घोड्याच्या तावडीतून नागरिकांची सुटका करावी. त्याचा इतरत्र शोध घेऊन बंदोबस्त करावा.’’

गजानन धाराशिवकर म्हणाले,‘‘मोकाट घोड्यांच्या मालकांचा शोध घेऊन समज दिली पाहिजे. तसेच मोकाट सोडण्यात आलेल्या घोड्यांचे अपघात होत आहेत. जखमी घोड्यांचे हाल पाहवत नाही.’’

loading image
go to top