Social Media Promotion During Election Period
sakal
अश्विनी पवार
पिंपरी : महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र, समाजमाध्यमांच्या (सोशल मीडिया) विविध व्यासपीठांवरून मात्र आचारसंहितेच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. फेसबुक, व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम आणि ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) यांसारख्या माध्यमांवर प्रचाराचे व्हिडिओ, रील्स पोस्ट करण्यापूर्वी त्याची परवानगी निवडणूक विभागाकडून घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, प्रत्यक्षात कोणत्याही परवानगीशिवाय सर्रास उमेदवारांचा सोशल मीडियाद्वारे प्रचार सुरू झाला आहे.