esakal | Pimpri : पात्र विद्यार्थी ‘स्वाधार’ योजनेपासून वंचित
sakal

बोलून बातमी शोधा

scholarship

Pimpri : पात्र विद्यार्थी ‘स्वाधार’ योजनेपासून वंचित

sakal_logo
By
आशा साळवी : सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने’चा (dr babasaheb ambedkar swadhar yojana) लाभ मिळाला नसल्याने अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. प्रत्यक्षात २०१९-२०चा काही विद्यार्थ्यांना पहिला हप्ता, तर सर्व पात्र विद्यार्थ्यांना दुसरा हप्ता अद्याप मिळाला नाही. तरीही समाजकल्याण विभागाकडून २०२०-२१ या आर्थिक वर्षात ७५ कोटी खर्च केल्याची माहिती समोर आली आहे. (Pimpri Eligible students deprived Swadhar scheme)

राज्य सरकारने (state govermnet) अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना’ (dr babasaheb ambedkar swadhar yojana) सुरू केली. या प्रवर्गातील ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांना योजनेचा फायदा मिळतो. अकरावी व बारावी तसेच बारावीनंतरच्या व्यावसायिक, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध स्तरांवरील महाविद्यालयीन शिक्षण संस्‍थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि निर्वाह भत्ता म्हणून वार्षिक रक्कम मंजूर केली आहे.

वसतिगृहात प्रवेश न मिळालेले आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना वर्षाला ६० हजार रुपये भत्ता मिळतो. या रकमेव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी पाच हजार व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना दोन हजार रुपये शैक्षणिक साहित्यासाठी दिले जातात. ही योजना आर्थिक स्वावलंबनास हातभार लावते, परंतु, सलग दोन वर्षांचे ‘स्वाधार’चे अर्थसाह्य विद्यार्थ्यांना अद्याप मिळालेले नाही. या योजनेचा लाभ होत नसल्याने विद्यार्थी त्रस्त आहेत. दुसरीकडे समाजकल्याण विभागाकडून २०१९-२० व २०२०-२१ या वर्षात योजनेवर सरकारने तरतूद उपलब्ध केली असून, त्यावर ७५ कोटी खर्च झालेला असल्याची माहिती दिली आहे.

अशी मिळते रक्कम

भोजन भत्ता (वार्षिक): ३२००० रुपये

निवास भत्ता (वार्षिक): २०००० रुपये

निर्वाह भत्ता (वार्षिक): ८००० रुपये

विद्यार्थ्यांना ‘कोरोना’ची झळ बसली आहे. प्रत्येक कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे. विविध शिष्यवृत्त्याही रखडल्या आहेत. संकटकाळात विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेमार्फत आर्थिक मदत केल्यास विद्यार्थ्यांना व कुटुंबीयांना मोठा आधार होईल. विद्यार्थ्यांना स्वाधारचा पहिला टप्पा त्यांच्या बँक खात्यात जमा करावा.

- संतोष जोगदंड, अध्यक्ष, सम्यक विद्यार्थी आंदोलन

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या आर्थिक वर्षासाठी स्वाधार योजनेसाठी सरकारने २०० कोटी तरतूद अर्थसंकल्पित केली आहे. मात्र, अद्याप आजअखेर योजनेवर निरंक तरतूद सरकारकडून प्राप्त झालेली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना लाभ मिळाला नाही. लवकरच रक्कम प्राप्त होईल.

- भारत केंद्रे, सहआयुक्त, समाजकल्याण आयुक्तालय

कसे व कुठे खर्च झाले?

प्रत्यक्षात २०१९-२० या वर्षाचा काही विद्यार्थ्यांना पहिला हप्ता आणि २०२०-२१ यावर्षीचा सर्व पात्र विद्यार्थ्यांना दुसरा हप्ता अद्याप मिळालेला नाही. आता शैक्षणिक वर्ष २०२०-२१ हे पूर्णतः ऑनलाइन आहे. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांचे फॉर्म घेतले नाही. पात्र विद्यार्थ्यांची यादीदेखील लावली नाही. २०१९-२० आर्थिक वर्ष संपून गेले, तरीही विद्यार्थ्यांना २०१९-२०चा भत्ता अद्याप मिळाला नाही. मग या वर्षीचे २०२०-२१चे ७५ कोटी रुपये कसे व कुठे खर्च झाले, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

loading image