esakal | पिंपरी : परीक्षा रद्दचा आदेश, तरीही इंग्रजी माध्यमांच्या शाळा ऐकेनात; पालकांच्या तक्रारी

बोलून बातमी शोधा

exam

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने पहिली ते अकरावी पर्यंतच्या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठवण्याचे आदेश शाळांना दिले आहेत.

पिंपरी : परीक्षा रद्दचा आदेश, तरीही इंग्रजी माध्यमांच्या शाळा ऐकेनात; पालकांच्या तक्रारी
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पिंपरी : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने पहिली ते अकरावी पर्यंतच्या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठवण्याचे आदेश शाळांना दिले आहेत. मात्र, विभागाचा आदेश धुडकावून बहुतांश इंग्रजी माध्यमांच्या शाळा सर्रासपणे विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेत आहेत. याबाबत पालकांच्या अनेक तक्रारी आल्या आहेत.

पिंपरी : अंध-अपंगांसाठीची राखीव जागा भाड्यानं; पालिकेच्या उत्पन्नात तीन लाखांची भर 

कोरोनाचा कहर वाढत असल्याने विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता, त्यांना पुढच्या वर्गात पाठवण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश दिल्यानंतर नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही पुढील वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. कोरोनाच्या प्रकोपामुळे मंत्र्यांच्या या निर्णयाचे शिक्षक व पालकांनी स्वागत केले आहे. 

पुण्यात रेमडेसिव्हिरसाठी 'कोन्ट्रोल रुम'; गरजूंना टोल फ्री क्रमांकावर संपर्काचं आवाहन

मात्र, या आदेशाला केराची टोपली दाखवत शहरातील काही इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यास सुरवात केली आहे. विशेष म्हणजे कोरोना परिस्थितीचा फायदा घेत, काही शाळांनी विद्यार्थ्यांना विविध असाईनमेंट देण्यास सुरुवात केली आहे. या प्रकाराने पालकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. याशिवाय शनिवारी व रविवारी ‘झूम कॉल’ घेऊन विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन घेत असल्याची तक्रार अनेक पालकांनी केली आहे. 

शिक्षण विभागाकडेही पालकांची तक्रार

शालेय शिक्षण विभागाद्वारे पहिली ते अकरावीच्या (दहावी वगळून) परीक्षा न घेण्याचे आदेश दिलेत. मात्र, ते आदेश शहरातील बऱ्याच शाळा मानत नसल्याने याबाबत काही पालकांनी शाळांविरोधात शिक्षण विभागाकडेही तक्रार केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.