
पिंपरी : महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या ताफ्यात अत्याधुनिक ड्राय केमिकल पावडर (डीसीपी) फायर टेंडर वाहन दाखल झाले आहे. अग्निशमन क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा हा उत्कृष्ट नमुना असून, विविध औद्योगिक, रासायनिक आणि विद्युत आगींवर अत्यंत प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यास सक्षम आहे. रासायनिक व ज्वलनशील पदार्थांना लागलेल्या आगींवर नियंत्रण मिळविण्यासाठी हा प्रभावी उपाय आहे, असे आयुक्त शेखर सिंह यांनी कळविले आहे.