
Footpath Encroachment
Sakal
वाकड : थेरगाव, वाकड आणि हिंजवडी या उपनगरांमधील पदपथ अतिक्रमणांमुळे बळकावले गेले आहेत. या नागरी सुविधा व्यावसायिकांचे भाडेतत्त्वावरील उत्पन्नाचे साधन झाल्या आहेत. पदपथांवरही व्यावसायिकांनी कब्जा केला असून, काही ठिकाणी पदपथ भाड्याने दिले जात आहेत. यातून लाखोंची कमाई होत असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. पण, प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने या व्यक्तींना आणखी बळ मिळत आहे.