विसर्जनासाठी महापालिकेने उभारले गणेश मूर्ती संकलन केंद्र...

इंद्रायणी नदी घाटावरील महापालिकेने उभारलेल्या मूर्ती संकलन केंद्रावर आपल्या मूर्ती जमा करत होते.
ganesh visarjan
ganesh visarjansakal

मोशी : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला... अशा घोषणा देत मोशीतील इंद्रायणी नदी घाटावरील महापालिकेने उभारलेल्या मूर्ती संकलन केंद्रावर आपल्या मूर्ती जमा करत होते.

शहरामध्ये कोराना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पाश्र्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याबाबत महापालिकेच्या वतीने निर्देश जारी करण्यात आले होते. नागरिकांची संभाव्य गर्दी टाळण्यासाठी येथील नदी पात्रात गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला होता. नागरीकांनी आपल्या गणेश मूर्तीचे विसर्जन घरातच करुन गणेश मूर्ती येथील संकलन केंद्रावर द्याव्यात असे आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहनाला शहरांमधील नागरिकांनी मोठय़ा संख्येने प्रतिसाद देत येथील संकलन केंद्रावर हजारो मूर्ती देण्यात आल्या.

ganesh visarjan
पिंपरी : लाडक्या गणरायाला भाविकांकडून निरोप

महापालिकेच्या वतीने येथील घाट परिसरामध्ये मोठा कापडी मंडप उभारण्यात आला होता. यामध्ये महापालिकेसह शहरातील विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते आलेल्या गणेश मूर्तींचे संकलन करुन घेत होते. अनेक भक्त येथील टेबलवर आपल्या गणेश मूर्ती ठेवून विधिवत पूजा व आरती करुन आपल्या लाडक्या गणेशाला निरोप देत होते.

महापालिकेच्या वतीने रात्रीसाठी मोठी प्रकाशयोजना करण्यात आली होती. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

कै. तुकाराम तनपूरे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य पोलीस व नागरीक मित्र मोशी विभाग या दिव्यांग संस्थेचे प्रमुख स्मिता सस्ते, उपप्रमुख सागर सुफल, संपर्क प्रमुख आशा माने, शरद डुबुकवाड आदी दिव्यांग कार्यकर्ते यांसह अविरत श्रमदान आदी संस्थांचे अनेक कार्यकर्ते पाचव्या दिवसांपासून रात्री उशिरापर्यंत मोफत गणेश मूर्ती संकलनाचे काम करत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com