Pimpri Grade Separator Blocked for 11 Hours as Container Gets Stuck
sakal
पिंपरी - निगडीहून दापोडीकडे जाणाऱ्या मार्गावर पिंपरीतील ‘ग्रेडसेपरेटर’मध्ये (समतल विलगक) मंगळवारी (ता.२४) मोठा कंटेनर अडकला. यामुळे ‘ग्रेडसेपरेटर’ आणि सेवा रस्त्यावरही वाहतूक कोंडी झाली होती. तब्बल अकरा तासांच्या प्रयत्नानंतर हा कंटेनर बाहेर काढण्यात आला. त्यानंतर येथील वाहतूक सुरळीत झाली. या घटनेमुळे इतर वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागला.