

Pimpri News
esakal
पिंपरी: दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एका दुकानावर गोळीबार केला. ही घटना शुक्रवारी (ता. १५) रात्री साडेनऊच्या सुमारास ताथवडे चौक येथे घडली. रावेत-औंध बीआरटी मार्गावर ए.जे. फर्निचर हे दुकान आहे. त्याच्या फलकावर हल्लेखोरांनी पाच ते सहा गोळ्या झाडल्या आणि ते पसार झाले.