Information Medicinal Plants : क्यूआर कोडद्वारे मिळते औषधी वनस्पतींची माहिती

औषधी वनस्पतींविषयी विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढविण्यासाठी क्विक रिस्पॉन्स (क्यूआर) कोडचा वापर करणारी यंत्रणा विकसित केली आहे.
QR Code
QR Codesakal
Summary

औषधी वनस्पतींविषयी विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढविण्यासाठी क्विक रिस्पॉन्स (क्यूआर) कोडचा वापर करणारी यंत्रणा विकसित केली आहे.

पिंपरी - औषधी वनस्पतींविषयी विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढविण्यासाठी क्विक रिस्पॉन्स (क्यूआर) कोडचा वापर करणारी यंत्रणा विकसित केली आहे. झाडांनाच क्यूआर कोड लावण्यात आले आहेत. तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेला कोड स्कॅन केल्यानंतर संबंधित झाडांची इत्थंभूत माहिती विद्यार्थ्यांना मिळत आहे. मुलांमध्ये पर्यावरणासंबंधी आवड निर्माण करणारी ही संकल्पना डुडुळगावातील राजमाता कॉलेज ऑफ फार्मसीच्या तृतीय वर्षातील विद्यार्थी गिरिराज गव्हाणे याने मांडली आहे. ‘राष्‍ट्रीय विज्ञान दिना’निमित्त या संकल्पना जाणून घेतली.

या महाविद्यालयात विविध प्रकारच्या वनस्पती, वृक्षांची लागवड केली आहे. देशी औषधी वृक्षांना क्यूआर कोड लेबल लावण्यात आले आहेत. ‘क्यूआर कोड औषधी उद्यान’ हा अभ्यासाशी निगडित उपक्रम राबविण्यात येत आहे.

फार्मसीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये औषधी वनस्पतींचे धडे आहेत. त्यामुळे मुलांचा थेट पर्यावरणाशी संबंध येत आहे. महाविद्यालय व परिसराला भेट देणारे वनसंपदेविषयी माहिती व्हावी यासाठी गिरिराज याने पुढाकार घेतला आहे.

या अनुषंगाने क्यूआर कोड तयार करण्यात स्मार्ट फोनद्वारे क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर अवघ्या काही सेकंदात वनस्पती, वृक्षाचे स्थान, वनस्पतीचे शास्त्रीय नाव, कुळ, त्यांचा वापर, वनस्पतींची जात, वनस्पती कुठे उगवते, विदेशी नाव, संस्कृत, मराठी, कन्नड, हिंदी अशा विविध भाषांतील नावे आणि त्‍यांच्या औषधी गुणधर्माची माहिती समोर येते. सोनामुखी, एरंड, निवडुंग, शतावरी, हाडजोड, कडुनिंब, कोकम अशा ४५ झाडांची लागवड केली आहे.

अशी सुचली संकल्पना

कुरळी गावी मामा बरोबर मी शेतात जायचो. ते लोकांना सहज सांगायचे, की कशाचे रोपटे आहे. त्यातून वनस्पतीच्या माहिती संकलित करून क्‍युआर कोडद्वारे कल्पना सुचली. ‘डिजिटल औषधी गार्डन’ ही आपल्या मोबाईल फोनचा वापर करून औषधी वनस्पतींची माहिती सहजपणे मिळवण्यासाठी डिजिटायझेशनची संकल्पना राबवली. प्रत्येक वनस्पतीसाठी क्यूआर कोड तयार करण्यासाठी विशिष्ट युआरएल (URL)चा वापर केला गेला. डिजिटल गार्डन तयार करण्यासाठी क्यूआर कोड सोबत वनस्पतीच्या नावाते लेबल लावले. रोपांची आवड असणारी कोणतीही व्यक्ती ही माहिती मोफत मिळवू शकते. यासाठी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. किशोर जैन, प्रा. सुहास घोडेकर, प्रसाद राणे यांचे मार्गदर्शन मिळाले.

‘भविष्यात महापालिका उद्यानात हा उपक्रम राबविण्यात आहे. या उद्यानात अशी एक प्रणाली विकसित करणार आहोत. जेणेकरून कोणत्याही व्यक्तीला वनस्पती माहिती सहज शक्य होईल.’

- गिरिराज गव्हाणे, विद्यार्थी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com