लोका सांगे ब्रम्हज्ञान; जागतिक वन दिनाच्या दिवशीच वृक्षांची कत्तल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वृक्षांची कत्तल

लोका सांगे ब्रम्हज्ञान; जागतिक वन दिनाच्या दिवशीच वृक्षांची कत्तल

मोशी : जगातील सर्व देशांमध्ये सोमवारी (ता. 21) वृक्षारोपण करुन जागतिक वनदिन व मंगळवारी (ता. 22) जागतिक जलदिन साजरा होत होता साजरा होत असतानाच मोशी प्राधिकरणातील पेठ क्रमांक 6 मधील दसरा चौकापुढील संत साई चौकामध्ये मात्र रात्रीच्या वेळी दोन झाडांची निर्घृणपणे कत्तल करण्यात आली असल्याची येथील नागरिकांनी कळविले आहे.

सोमवारी (ता.21) व मंगळवारी रात्री (ता.22) अशा दोन रात्री कटर व झाडे तोडण्याच्या साहित्यांनी ही झाडे रात्रीच्या वेळी तोडली असल्याचे काही नागरीकांना सांगितले. आज पहाटेच्या अंधुक प्रकाशात चालण्याचा व्यायाम करणाऱ्या नागरिकांना ज्या वेळी दिसली त्यावेळी अनेक नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.

Tree Cutting

Tree Cutting

पूर्ण वाढ झालेली ही मुचकुंद नावाची ही दोन झाडे असून ऐन उन्हाळ्यात ही झाडे सध्या येथील पांथस्तांना सावली देण्याचे काम करत होती. मात्र गेल्या दोन दिवसांत आणि विशेषतः सोमवारी जागतिक वन व वृक्षसंवर्धन आणि जागतिक मंगळवारी जागतिक जल दिनाच्या दिवशीच ही झाडे निर्दयीपणे तोडून भर रस्त्यातच टाकलेली असल्याने येथून ये जा करणारे नागरीक हळहळ व्यक्त करत आहेत.

रात्रीच्या वेळी जेव्हा ही झाडे तोडण्याचा प्रकार सुरू होता तेव्हा अनेक नागरिकांना खिडकीतून तोडण्याचा आवाज येत होता. याबाबत महापालिका उद्यान निरीक्षक राजेश वासवे यांनी सांगितले, "या वृक्षाची मुळे कुजल्यामुळे हे दोन्ही वृक्ष बुंध्याजनळून मोडून पडले आहेत.

Tree Cutting

Tree Cutting

मात्र वृक्षमित्र प्रशांत राऊळ व विठ्ठल वाळुंज म्हणाले," ही झाडे पडल्याचे भासवल जात आहे. जेव्हा यांचे जवळून निरीक्षण केले गेले तेंव्हा वेगळा प्रकार झाल्याचा संशय येतोय. पिंपरी चिंचवड शहरात कृष्णा हेरिटेज, इंद्रायणी नगर मध्ये याआधीही झाडांच्या मुळाशी ऍसिड ओतुन झाडं मारण्याचे प्रकार झाले आहेत. त्यामुळे ही घटना बघितल्यावर देखील अनेक प्रश्न निर्माण होतात. झाडं रात्रीचीच कशी पडली? दोन दिवसात दोन झाडं कशी पडली? जर झाडं धोकादायक स्थितीत होती तर याची माहिती प्रशासनमध्ये कुणाला, उद्यान विभाग किंवा अग्निशामक दलाला दिली होती का? झाडांवर चेन करवतीच्या खुणा कशा ? क्रेनच्या वायर रोपच्या खुणा कशा? या झाडाचा नेमका त्रास कुणाला होता का ? जिथुन झाडं मोडलं गेलं आहे तिथं झाडे कुजलेली का नाही ? वारा, वादळ, पाऊस नसतात झाडे पडली कशी ?

झाडे जर कमकुवत झाली होती तर त्यांना एवढा फुलांचा बहार कसा आला होता आणि सगळ्यात महत्त्वाचे झाडं पडलं की पाडलं गेलं आणि पडल्याचं भासवले जात आहे? याची चौकशी झाली पाहिजे. रात्रीच्या वेळी जेव्हा ही झाडे तोडण्याचा प्रकार सुरू होता तेव्हा अनेक नागरिकांना खिडकीतून तोडण्याचा आवाज येत होता.

महापालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने या तोडलेल्या झाडांची चौकशी करुन ही झाडे तोडणारांवर कडक कारवाई करण्याची मागणी येथील वृक्षप्रेमी व भूगोल फाऊंडेशनचे विठ्ठल वाळुंज, प्रशांत राऊळ याबरोबरच स्थानिक नागरीकांनी केली आहे.

टॅग्स :Pimpritree