वाकडमधील 'या' स्कूलवर महापालिकेची कारवाई; शालेय साहित्याची केली नियमबाह्य विक्री

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जुलै 2020

गणवेश, वह्या, पुस्तके ठेवलेल्या दोन खोल्या सील केल्या आहेत. 

पिंपरी : शाळेत नियमबाह्य पद्धतीने शालेय साहित्याची विक्री केल्याप्रकरणी वाकड येथील युरो स्कूलवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाने कारवाईचा बडगा उगारला. गणवेश, वह्या, पुस्तके ठेवलेल्या दोन खोल्या सील केल्या आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

या बाबत पर्यवेक्षक व तक्रार निवारण अधिकारी विलास पाटील यांनी सांगितले, की युरो स्कूलमध्ये नियमबाह्य पद्धतीने व जबरदस्तीने गणवेश, वह्या, पुस्तकांची विक्री होत असल्याच्या पालकांच्या तक्रारी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे आल्या होत्या. त्यानुसार पाहणी केली असता शाळेच्या दोन खोल्यांमध्ये वह्या, पुस्तके, गणवेश यांची विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. पालकांना शालेय साहित्य खरेदीसाठी जबरदस्ती केली जात असल्याचेही आढळून आले. त्यामुळे गणवेश, वह्या, पुस्तके ठेवलेल्या दोन खोल्यांना करण्यात आल्या आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, शाळांमध्ये साहित्य विक्रीला मनाई असतानाही अनेक शाळा नियमबाह्य पद्धतीने चढ्या दराने शालेय साहित्याची विक्री करतात. पालकांनी बाहेरून साहित्य घेणार असल्याचे सांगितले तरी शाळेतूनच साहित्य घेण्याची जबरदस्ती केली जाते. यामुळे पालकांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri municipal corporation action against euro school in wakad for illegal sale of school materials