Pimpri Chinchwad: पिंपरी-चिंचवडमधील थेरगाव आणि चिंचवडगाव यांना जोडणारा नवीन 'बटरफ्लाय पूल' सौंदर्यपूर्ण डिझाइन आणि रोषणाईमुळे आकर्षण बनला आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त सुरु केलेली रोषणाई रात्री अधिक सुंदर दृश्य निर्माण करते.
पिंपरी : तुम्ही गेल्या पंधरा-वीस दिवसांत चिंचवडगावात गेला आहात का?, मंगलमूर्ती वाडा किंवा धनेश्वर मंदिर परिसर बघितला आहे का? त्यापासूनच जवळच पवना नदीवर थेरगाव आणि चिंचवडगाव जोडणारा नवीन पूल रहदारीसाठी खुला केला.