पिंपरी : राष्ट्रीय लोकअदालीतून न्यायालयाला मिळाली इतकी तडजोड रक्कम

पिंपरी-चिंचवड न्यायालय व पुणे जिल्हा विधी प्रधिकरण व पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट बार असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय लोकअदालीचे (ता.२५) शनिवारी आयोजन केले होते.
court
courtsakal media

पिंपरी - पिंपरी-चिंचवड न्यायालय व पुणे जिल्हा विधी प्रधिकरण व पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट बार असोशिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय लोकअदालीचे (ता.२५) शनिवारी आयोजन केले होते. लोकअदालतीत मोरवाडीतील दिवाणी व फौजदारी व आकुर्डी महापालिका न्यायालयातील मिळून ७२६६ निकाली खटल्यातून एका दिवसात १७ करोड ३० लाख ४१ हजार ५३९ इतकी तडजोड रक्कम जमा झाली.

पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उपायुक्त चंद्रकांत इंदलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त सागर कवडे, न्यायाधीश डी. आर. पठाण, आर. एस. वानखेडे, आर. आर.काळे, पी.सी. फटाले, एन. टी.भोसले व पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोशिएशन अध्यक्ष यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय संविधानाला पुष्पहार अर्पण करुन दिपप्रज्वलण केले. अध्यक्ष ॲड. गोरखनाथ झोळ व कमिटी यांनी पुष्पगुच्छ, शाल देऊन सर्वांचे स्वागत केले.

court
शुल्क वसुल होण्यासाठी शाळा लढवतात नवनवीन शक्कल

राष्ट्रीय लोकअदालततीत ॲड. पल्लवी विघ्ने, शुभांगी थोरात, माधुरी दाते, श्वेता निमसे, मेघा पवार, सारिका मोरे, कांता गोरडे, पुनम राऊत, अविनाश पाटील, संतोष मोरे, शुभांगी थोरात, श्रध्दा मंचरकर, भाग्यश्री झुळूक, संकल्पा वाघमारे यांनी काम पाहिले.

अध्यक्ष ॲड. गोरखनाथ झोळ, उपाध्यक्ष ॲड. पांडुरंग शिनगारे, सचिव ॲड. महेश टेमगिरे, महिला सचिव ॲड. मोनिका गाढवे, सहसचिव अनिल शिंदे, खजिनदार हरिष भोसुरे, ॲाडिटर धनंजय कोकणे, सदस्य ऋतुराज आल्हाट, अमित गायकवाड, मंगेश नढे, दिनेश भोईर, प्राची शितोळे, कृष्णा वाघमारे यांनी केले. प्रस्तावना माजी अध्यक्ष सतीश गोरडे यांनी केली. सुत्रसंचालन माजी अध्यक्ष सुहास पडवळ यांनी केले. आभार सचिव महेश टेमगिरे यांनी मानले.

आकडे बोलतात :

  • पिंपरी न्यालयातील निकाली खटले : ३५१

  • पिंपरी न्यायालतील जमा महसूल : ४,२९,७५, ४२९

  • आकुर्डी न्यायालयातील निकाली खटले : ६९१५

  • आकुर्डी न्यायालतील जमा महसूल : १३,००, ६६, ११० रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com