
पिंपरी - ‘वारी विठुरायाची - पर्यावरण संवर्धनाची’ असा संदेश देत सोमवारी (ता. १२) ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आषाढी वारीनिमित्त ‘साथ चल’ उपक्रम राबविण्यात आला. शहरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, ‘यिन’चे पदाधिकारी यांच्यासह शहरातील विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आषाढी वारीनिमित्त ‘सकाळ’तर्फे ‘साथ चल’ उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचा प्रारंभ सोमवारी पिंपरीतील अहल्यादेवी होळकर चौकात (मोरवाडी चौकात) झाला. संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, फिनोलेक्स केबल्सचे अध्यक्ष अमित माथूर यांच्या उपस्थितीत ‘पर्यावरण संवर्धनाची’ सामूहिक शपथ घेण्यात आली. ‘यिन’चे विद्यार्थी साक्षी नेहारकर, आरजू मुलाणी, सलोणी सिंग, समृद्धी गवारी, श्रुती मोहरकर, गौरव विटकर, चेतन लिम्हण, निखिल जोशी, संदेश हुरसाळे, विक्रम खाडे, सुमेध ठाणांबीर यांनी पर्यावरण संवर्धन व संगोपनावर पथनाट्य सादर केले. प्रा. डॉ. मारुती शेलार, प्रा. डॉ. शैलेंद्र कांबळे, प्रा. अविनाश गोलांडे, प्रा. वंदना पेडणेकर, प्रा. ज्योजी चौधरी, प्रा. आश्लेषा देवले सहभागी झाले होते.
सहभागी शाळा, महाविद्यालये
थेरगाव येथील मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्रा. प्रमोद सकपाळ, मुकेश रत्नपारखी, प्रसाद कदम, अविनाश टेकाडे, शैलेंद्र सलवांकर, राहुल खिस्ते, विलास पाटील, रवींद्र बढे, दिलीप चव्हाण, अमोल पवार, सचिन जगदाळे; चिंचवड स्टेशन येथील श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूलचे प्राचार्य विक्रम काळे, पर्यवेक्षक शशिकांत हुले आणि शिक्षक व विद्यार्थी. डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस ॲंड रिसर्च पिंपरी, प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय आकुर्डी, रसिकलाल एम. धारिवाल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चिंचवड. आयआयसीएमआर एमबीए, आयआयसीएमआर एमसीए आकुर्डी.
प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स ॲंड कम्प्युटर स्टडीज् चिंचवड, प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, अलार्ड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, जेएसपीएम राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय ताथवडे, डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीचे डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय पिंपरी, डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पिंपरी, औद्योगिक शिक्षण मंडळाचे आर्टस् कॉमर्स अँड सायन्स, मॉडर्न कॉलेज ऑफ फार्मसी निगडी, एटीएसएस कॉलेज ऑफ बिझनेस स्टडीज् अँड कम्प्युटर ॲप्लिकेशन्स, मंघणमल उधाराम कॉलेज ऑफ कॉमर्स. एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. ‘यिन’चे विद्यार्थी ऋषिकेश पवार, सोहेल शेख, श्रीकांत साळुंके, वेदांत सुडे, ऋषिकेश औरादे, पियूष इंगोले, मृणाल शास्रकार, ध्रुव कठाळे, पूजा काळे, रोहिणी पवार, ऋषिकेश ससाणे, प्रतिक भागवत, प्रज्वल काळे, शिवम तोरणेकर, संजय पारधी, सार्थक बाराथे, गणेश वाघ यांचे सहकार्य लाभले.
सहभागी संस्था, संघटना
ज्येष्ठ नागरिक संघ एम्पायर इस्टेट चिंचवड स्टेशन, म्हाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे बी. आर. माडगूळकर, प्रज्ञा माडगुळकर. वुई टुगेदर फाउंडेशनचे सुनील चव्हाण, रुकसाना काझी, शैलजा कडुलकर, सोनाली डावरे, शंकरराव कुळकर्णी, सदाशिव गुरव, रवींद्र काळे, सलीम सय्यद, क्रांतिकुमार कडुलकर; संघर्ष मित्र मंडळ ट्रस्ट चिखलीच्या अध्यक्ष सीता केंद्रे, माया सांगवे, सवित्रा कागणे, संजय कडोलकर, ओम डांगे, राजू कांगणे, अविनाश काळे, यश काकडे, साहील, दिगंबर कांगणे, इंडियन डेंटल असोसिएशन पिंपरी-चिंचवड शाखेचे राष्ट्रीय सचिव डॉ. मनीषा गरूड, शाखाध्यक्ष डॉ. संतोष पिंगळे, उपाध्यक्ष डॉ. मोना दिवाण, प्रमुख कार्यकारी सदस्य डॉ. सुमंत गरुड. फेरीवाला महासंघ काशिनाथ नखाते, हरी भोई, अंबालाल सुखवाल, अजित कदम, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेचे अण्णा जोगदंड, संगीता जोगदंड, गजानन धाराशीवकर, संजना करंजावणे. सामाजिक कार्यकर्ते मोहन बारटक्के. गजानन महाराज मंदिर समिती अरुण शिंदे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.