Sakal Vidya Edu Expo : करिअरबाबत विद्यार्थी, पालकांना ‘सकाळ विद्या एज्यु एक्स्पो २०२३’ अंतर्गत मार्गदर्शन

दहावी, बारावी बरोबरच ‘सीईटी’चा निकालही लागला आहे. त्यामुळे आता पुढे काय?... असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांसमोर आहे. त्याचे उत्तर लवकरच मिळणार आहे.
Sakal Vidya Edu Expo 2023
Sakal Vidya Edu Expo 2023sakal

पिंपरी - दहावी, बारावी बरोबरच ‘सीईटी’चा निकालही लागला आहे. त्यामुळे आता पुढे काय?... असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांसमोर आहे. त्याचे उत्तर लवकरच मिळणार आहे. कारण, करिअरबाबत विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन व चर्चासत्राचे आयोजन ‘सकाळ विद्या एज्यु एक्स्पो २०२३’ अंतर्गत शनिवार (ता. १७) व रविवारी (ता. १८) चिंचवड स्टेशन येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटरमध्ये केले आहे.

दहावी-बारावीनंतरच्या उच्चशिक्षणासाठी विद्यार्थ्यांसह पालकांच्या मनात चिंता आहे. कोणत्या शाखेत ॲडमिशन घ्यायचं? करिअर कशात करायचं? काहींनी ठरवलेलंही असेल. काहींना करिअरबाबत कोणाकडून मार्गदर्शन घ्यावं?, असाही प्रश्न पडलेला असेल. त्यामुळेच दहावी- बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसह पालकांसाठी ‘सकाळ’तर्फे मार्गदर्शन व चर्चासत्र आयोजित केले आहे. तीही अगदी विनामूल्य. मुख्य प्रायोजक पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, सहप्रयोजक एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर सहयोगी प्रायोजक क्रिएटिव्ह अकॅडमी, एमआयटी आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज हे आहेत.

शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणतात...

सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो’मध्ये अनेक संस्था सहभागी झाल्या आहेत. या संस्थेच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना सॉफ्ट स्किल्ससह तांत्रिक कौशल्ये तयार करण्यासाठी एक परिपूर्ण व्यासपीठ दिले जाते. ‘टीटीए’ चिंचवडमध्ये फॅशन डिझाईन, इव्हेंट मॅनेजमेंट, इंटिरिअर डिझाईन, ॲनिमेशन आणि व्हीएफएक्स असे विविध प्रशिक्षण दिले जाते. फॅशनच्या दुनियेत विद्यार्थ्यांच्या सृजनशिलतेला वाव मिळणारे प्रशिक्षण ऑफलाइन आणि ऑनलाइन देण्यात येते.

- निकिता अग्रवाल, संचालक टाइम्‍स ॲण्ड ट्रेंड्स ॲकॅडमी, चिंचवड

दोन दिवसांच्या ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो’मध्ये विविध क्षेत्रांतील शैक्षणिक संधीबाबत विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन मिळणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शहरातील पालक व विद्यार्थ्यांना करियरच्या विविध क्षेत्रातील संधीबाबत नवीन माहिती उपलब्ध होणार आहे. अधिकाधिक पालक आणि विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक प्रदर्शनाला भेट देणे आवश्‍यक आहे. आता नवीन शैक्षणिक राष्ट्रीय धोरणामुळे शिक्षणाचा पॅटर्न बदल्यांमुळे पाल्यांना नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. नवीन शैक्षणिक धोरण, अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती आणि दहावीनंतरचे उच्च शिक्षण याबाबत, विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन मिळणार आहे.

- संदीप पाचपांडे, अध्यक्ष, एएसएम ग्रुप

Sakal Vidya Edu Expo 2023
‘लक्ष्य’भेद : अभ्यास आणि अडथळ्यांची शर्यत

नागरी हवाई वाहतूक क्षेत्रात झपाट्याने वाढ होत असल्याने वैमानिकांची मागणीही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कमी कालावधीत कमर्शिअल पायलट लायसन्स मिळवून विविध एअरलाइन्समध्ये नोकरीची संधी मिळू शकते. भरघोस पॅकेज व सुविधांचा लाभ कार्व्हर एव्हीएशनच्या अनेक विद्यार्थ्यांना आजपर्यंत मिळाला आहे. त्वरित नोकरीची संधी व उज्ज्वल भवितव्य असलेल्या या क्षेत्राचा विचार विद्यार्थी व पालकांनी करण्यास हरकत नाही.

- प्रमेश पारीख, सरव्यवस्थापक, ॲकॅडमी ऑफ कार्व्हर एव्हिएशन, बारामती

एका अजाण मुलाचे एका समक्ष नागरिकात रूपांतर होते ते केवळ शिक्षणाने. आपल्या सभोवतालचे अवकाश समजून घेण्याची त्याला क्षमता देते ते शिक्षण. बदल हा जगाचा नियम आहे, पण हा बदल संपूर्ण सृष्टीच्या हिताचा असावा, यासाठी झटण्याची ताकद देते ते शिक्षण. म्हणूनच जर खऱ्या अर्थाने बदल घडवायचा असेल तर शिक्षणाला पर्याय नाही. अशाच प्रकारचे शिक्षण देण्यासाठी आचार्य अॅकॅडमी कार्यरत आहे.

- ज्ञानेश्वर मुटकुळे, संस्थापक संचालक, आचार्य ॲकॅडमी, बारामती

Sakal Vidya Edu Expo 2023
Sakal Vidya : ‘सकाळ’तर्फे उद्या चर्चासत्र; करिअरबाबत मार्गदर्शन आणि शंकांचे होणार निरसन

काय? कधी? केव्हा? कुठे?

  • काय? : सकाळ विद्या एज्यु-एक्स्पो

  • कधी? : १७ व १८ जून २०२३

  • केव्हा? : सकाळी १० ते रात्री ८

  • कुठे? : ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटर, चिंचवड

काय सांगता?

  • आता घेता येईल करिअरचा योग्य निर्णय

  • दहावी, बारावीनंतर ठरवा करिअरची दिशा

  • शिक्षणाचे सर्व पर्याय एकाच छताखाली

  • विविध क्षेत्रांतील करिअरसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन

अधिक माहितीसाठी

संपर्क : ८३७८९८७८३६

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com